ETV Bharat / state

Congress BJP Clashes: पुण्यात काँग्रेस-भाजपमध्ये 'या' कारणावरून जुंपली; युवक काँग्रेस आक्रमक

सोशल मीडियावर भाजपकडून काँग्रेस भवनाचा 'राजवाडा' असा उल्लेख केल्यानंतर आज (गुरुवारी) युवक काँग्रेस आक्रमक झाली. पक्ष कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात काँग्रेस भवनच्या इतिहासाचे पुस्तक देण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना अडवून धरले. यावरून पुण्यातील कांग्रेस भवनात पोलीस आणि युवक काँग्रेसमध्ये बाचाबाची झाली.

Congress BJP Clashes
भाजपविरुद्ध युवक कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा
author img

By

Published : Jun 1, 2023, 3:54 PM IST

भाजपविरुद्ध युवक कॉंग्रेसचा आक्रमक पवित्रा

पुणे: केंद्र सरकारमध्ये भाजपप्रणित मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडून 'नऊ वर्षे, नऊ प्रश्न' उपस्थित करण्यात आले होते. यालाच उत्तर म्हणून भाजपच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काँग्रेसने पुण्यात काय केले? असे विचारले गेले. यासह पुण्यात राजवाडावजा काँग्रेस भवन बांधले आहे, अशी पोस्ट केली गेली. यावर आज युवक काँग्रेसकडून भाजप कार्यालयात काँग्रेस भवनच्या इतिहासाचे पुस्तक देण्यात येत होते.

युवक कॉंग्रेस आक्रमक: पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर युवक काँग्रेसने आक्रमक होत काँगेस भवनच्या गेटवर चढून भाजप कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी रस्त्यावरच काँग्रेस भवन बाहेर या कार्यकर्त्यांना थांबविले.

भाजपने बदनामी थांबवावी: यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले की, भाजपला काँग्रेस भवनचा इतिहास माहीत नाही. म्हणून त्यांनी सोशल मीडियावर काँग्रेस भवनचा उल्लेख 'राजवाडा' असा केला आहे. त्यांना काँग्रेस भवनचा इतिहास काय आहे, याचे एक पुस्तक आमच्या माध्यमातून देण्यात येत होते; मात्र पोलिसांवर दबाव आणून आम्हाला इथेच थांबविण्यात आले आहे. ही वास्तू ऐतिहासिक असून याला एक इतिहास आहे. या वास्तूची बदनामी भाजपने थांबवावी. अन्यथा युवक काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

या कारणावरूनही भाजप-कॉंग्रेसमध्ये वाद: नवीन संसद भवनाच्या उद्‌घाटनावरून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावर माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधक अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा विषय लोकांसमोर मांडत आहेत. राष्ट्रपतींचा सन्मान प्रत्येक व्यक्ती करते आणि म्हणूनच नरेंद्र मोदींना एका महिलेला जी आदिवासी भागातून आलेल्या आहेत. त्यांना देशाच्या सर्वोच्चपदी बसवले आहे. हा विषय राष्ट्रपती यांच्या सन्मानाचा नाही तर हा विषय 75 वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा आहे. पार्लमेंट भवन देखील ब्रिटिशांनी बांधले होते, त्याचा वापर आपण करतोय. आपण आपल्या हक्काची स्वतःने तयार केलेली आपण आपल्या हक्काची वाटावी अशी इमारत तयार करत आहोत. विरोधकांना मनापासून विनंती करायची आहे. कृपया यात राजकारण न आणता आपल्या समाजाचे पुढचे एक पाऊल पडत आहे. लोकशाही सुदृढ होण्यासाठी आवश्यक असणारी संसद जिथे कायदे केले जातात, त्याच उद्घाटन होत आहे. अशा वेळेला आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावं, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

हेही वाचा:

  1. Rahul Gandhi On Modi : लोकसभेतून अपात्र होईल असे कधीही वाटले नव्हते-राहुल गांधी
  2. Inauguration of Parliament House : संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांना सुरेश प्रभूंचे आवाहन
  3. Political Crisis In Maharashtra : शिवसेनेच्या घटनेवर ठाकरेंचे भवितव्य; 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांची भूमिका निर्णायक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.