ETV Bharat / state

दौंड : मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल - दौंड ठेकेदारावर गुन्हा दाखल

केंद्र शासनाकडून मनमाड-नगर-दौंड-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम केले जात आहे. मागील पाच महिन्यांपासून सोनवडी येथे भीमा नदी पूल-नगर मोरी-रेल्वे उड्डाण पूल-गजानन सोसायटी-गोकूळ हॉटेल-रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने आणि अतिशय संथ गतीने रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.

खोदलेला रस्ता
author img

By

Published : Nov 16, 2019, 8:51 AM IST

पुणे - दौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर-दौंड-बारामती-फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

केंद्र शासनाकडून मनमाड-नगर-दौंड-बारामती-फलटण या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे याचे कंत्राट आहे. महामंडळाने अग्रवाल कंपनीला रस्त्याच्या कामाचा ठेका दिला आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून सोनवडी येथे भीमा नदी पूल-नगर मोरी-रेल्वे उड्डाण पूल-गजानन सोसायटी-गोकूळ हॉटेल-रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने आणि अतिशय संथ गतीने रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे.

हेही वाचा - पुण्यातील रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार

पावसाळ्यात खोदकामामुळे रस्त्यात चिखल होऊन दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. चारचाकी आणि अवजड वाहनेही गाळात फसण्याचे प्रकार घडत आहेत. अत्यंत वर्दळीचा असलेला डांबरी रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसताना बुधवारी परस्पर रस्ता बंद करून अवजड वाहने व यंत्रे रस्त्यावरच उभी करण्यात आली. या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी किरण राऊत यांनी पोलिसांत तक्रार दिली. बेदरकारपणे लोकांच्या जीवितास आणि व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण करणे व वाहतूकीला प्रतिबंध केल्याप्रकरणी ठेकेदार आणि पर्यवेक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body: दौंड
दौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर- दौंड- बारामती- फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. 

केंद्र सरकारकडून मनमाड- नगर- दौंड- बारामती- फलटण- बेळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याचे कंत्राट घेतलेले असून, अग्रवाल कंपनीस रस्त्याच्या कामाचा ठेका दिला आहे. मात्र, मागील पाच महिन्यांपासून सोनवडी येथे भीमा नदी पूल- नगर मोरी- रेल्वे उड्डाण पूल- गजानन सोसायटी- गोकूळ हॉटेल- रोटरी सर्कलदरम्यान मनमानी पद्धतीने अतिशय संथ गतीने अतिक्रमणे न काढता काम सुरू आहे.

पावसाळ्यात आणि ऑक्‍टोबरच्या अतिवृष्टीदरम्यान खोदकामामुळे चिखल होऊन अनेक दुचाकीस्वार घसरून पडले; तर रस्ता असमान असल्याने चारचाकी आणि अवजड वाहने रुतण्याचे प्रकार घडत आहेत. त्यात दीपमळा येथे बुधवारी संध्याकाळी अत्यंत वर्दळीचा डांबरी रस्ता उकरून खोदकाम करण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. कोणताही जबाबदार अधिकारी उपस्थित नसताना परस्पर रस्ता बंद करून अवजड वाहने व यंत्र रस्त्यावरच उभी केली होती. या प्रकरणी वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी किरण राऊत यांनी फिर्याद दिली आहे. बेदरकारपणे लोकांच्या जीवितास आणि व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण करणे व गैरमार्गाने प्रतिबंध केल्याप्रकरणी ठेकेदार आणि पर्यवेक्षकांवर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.