पुणे : CM Eknath Shinde on Maratha Reservation : शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या तीर्थक्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar Temple) येथे महादेवाचे दर्शन घेतले. एकनाथ शिंदे यांनी येथे मनोभावे पूजा केली. राज्यावरील दुष्काळाचे संकट टळू दे, माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी घातले.
मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया : आरक्षणासंदर्भात राज्य सरकार कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणार नाही. याबाबत निर्णय घाईगडबडीत घेतला आणि जर न्यायालयाने त्याला स्थगिती दिली तर ती फसवणूक ठरेल. त्यामुळे राज्य सरकार कोणतीही फसवणूक करू इच्छित नाही, कोणालाही फसवू इच्छित नाही. सरकारला मराठा समाजासाठी थातुरमातूर किंवा तात्पुरतं काम करायचे नाही. त्यामुळे आम्ही कायदेशीर, चांगली फळं देणारं आणि समाजाला फायदा देणारं काम करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.
राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू : जालना येथील मराठा आंदोलाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. सकल मराठा समाज यामुळं आक्रमक झालाय. ( Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत गेल्या १४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. तर आरक्षणाच्या विषयावरून विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
मराठा समाज आक्रमक - सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींकडून आमदार, खासदार यांचा निषेध करण्यात येत आहे. जालना येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन, उपोषण, मोर्चे काढण्यात येत आहेत.
हेही वाचा -
Maratha Reservation Protest : मराठा समाज आक्रमक; संतप्त तरुणानं केला आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला; सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, तोडगा निघणार?