पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी (ता. १७) बारामतीत येणार आहेत. बारामती मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी ते माळेगावमध्ये सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या मतदारसंघात स्वतंत्र सभा होणार असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.
हेही वाचा - बारामतीतून एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार; अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास
मुख्यमंत्री गुरुवारी झैलसिंग रोडवरील माळेगाव साखर कारखान्याच्या इंग्लिश मीडियम शाळेशेजारील मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सभा घेणार आहेत. यासाठी माळेगाव इंजिनिरींग कॉलेजजवळ हेलीपॅडचे काम सुरू आहे. बारामतीची सभा झाल्यानंतर त्याचदिवशी मुख्यमंत्री सातारा, इंदापूर आणि दौंडला सभा घेणार आहेत. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (ता. १८) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बारामती नगर परिषदेसमोरील शारदा प्रांगण येथे दुपारी 4 वाजता सभा घेणार आहेत.
हेही वाचा - गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ; त्यांनी बारामतीतून लढावे - मुख्यमंत्री
दरम्यान, शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील काय बोलणार याकडे बारामतीसह राज्याच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.