पुणे (पिंपरी-चिंचवड): करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. करोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी चोख भूमिका बजावत असून रस्त्यावर उतरून पोलीस देखील आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सांगवी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यांनी पथसंचलन केले. प्रत्येक गल्लीमध्ये त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.
वारंवार नागरिकांना आवाहन करूनही ते घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचारीही कारवाई करत अनेकांना काठीचा प्रसाद दिला. त्यानंतर बाहेर फिरणाऱयांचे प्रमाण काहीसे कमी झाले. दरम्यान, ज्या गल्लीत पोलिसांनी नागरिक आणि तरुणांना काठ्यांचा प्रसाद दिला तिथेही पथसंचलनाच्या वेळी पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी टाळ्या वाजवण्यात आल्या.
लॉकडाऊन काळात पोलीस आपल्या कुटुंबापासून मागील अनेक दिवसांपासून दूर आहेत. अशा वेळी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम नागरिक करत आहेत. यामुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढत आहे.