ETV Bharat / state

दौंड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन - रस्ता रुंदीकरणासाठी दौंड शहरात सर्व पक्षीय नेत्यांचे आंदोलन

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून जाणारा मनमाड ते सांगली हा राष्ट्रीय महामार्ग वास्तविक 24 मीटर इतका लांब आहे. मात्र, प्रत्यक्षात तो 12 मीटरचा करण्यात येत आहे. शहरातील काही ठिकाणी अतिक्रमण न काढता रस्त्याची कामे केली जात आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी दौंड शहरातील अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांच्यावतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.

Citizens' agitation to widen the national highway through Daund city
दौंड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन
author img

By

Published : Dec 14, 2019, 8:56 PM IST

पुणे - दौंड शहरातून जाणारा मनमाड ते सांगली हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता मोठा होण्यासाठी तोंडी व लेखी स्वरुपाची सूचना प्रशासनाला केली. परंतु, प्रशासन गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे दिसत आहे. म्हणूनच येथील अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता मोठा झाला पाहिजे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.

दौंड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची रुंदी वाढवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन

हेही वाचा... भारत बचाओ रॅली : 'देशात भांडणे पेटवून मूळ मुद्यांना बगल देणं हाच भाजपचा डाव'

मनमाड-सांगली हा राष्ट्रीय क्रमांक 160 अहमदनगर-दौंड- बारामती- फलटण यामार्गाने पुढे सांगलीला जाणार आहे. त्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग प्रत्यक्षात 24 मीटरचा आहे. अहमदनगर जिल्हातील शेवटच्या काष्टी गावापर्यंत 24 मीटरचा असून प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग 12 मीटरचा करण्यात येत आहे. दौंड शहरातील काही ठिकाणी अतिक्रमण न काढता रस्त्याचे कामे केली जात आहे. त्याचा विरोध करण्यासाठी दौंड शहरातील अनेक राजकीय पक्ष आणि नागरिकांच्यावतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा... शिक्षेच्या अंमलबजावणी प्रक्रियेला वेग; निर्भयाचे गुन्हेगार तणावाखाली, खाणे-पिणे झाले कमी - सूत्र

दौंड शहरातील उड्डाण पूल ते गोल राऊंड हा रहदारीचा मुख्य रस्ता नियमानुसार केला जात नाही. शहरातून जाणारा मनमाड ते सांगली हा राष्ट्रीय महामार्ग रस्ता नियमानुसार २४ मीटरचा व्हायला हवा. परंतु, काही ठिकाणी तो १८ मीटर तर काही ठिकाणी १२ मीटरचा केला आहे. वास्तविक पाहता हा रस्ता मोठा होणे गरजेचे आहे. मात्र काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता लहान केला जातोय, असा आरोप नागरिकांनी केला.

हेही वाचा... मुख्यमंत्री सहायता निधीला गती मिळाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

शुक्रवारी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात 'दौंडकर जागे, व्हा रस्ता रुंदीकरणासाठी एकत्र या' हा नारा देत आंदोलन केले. दौंडकराच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही, अतिक्रमण काढा दुर्घटना टाळा, मायबाप सरकार जागे व्हा अशा स्वरूपाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान, नगरसेवक राजेश गायकवाड आदी नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:Body:दौंड शहरातील महामार्गाची रुंदी वाढवण्यासाठी आंदोलन

दौंड

मनमाड-सांगली राष्ट्रीय क्रमांक 160 हा अहमदनगर-दौंड- बारामती- फलटण मार्गी पुढे सांगलीला जाणार असून त्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत आहे. प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग प्रत्यक्षात 24 मीटरचा असून अहमदनगर जिल्हातील शेवटच्या काष्टी गावापर्यंत 24 मीटरचा असून प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून 12 मीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग करण्यात येत असून दौंड शहरातील मोठ्या लोकांचे राजकीय हित सबंधतुन घर वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे अतिक्रमण न काढता रस्त्याचे कामे केली जात आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी दौंड शहरातील राजकीय पक्ष आणि शहरातील नागरिकांच्या वतीने शांततेने आंदोलन करण्यात आले .

दौंड शहरातील उड्डाण पूल ते गोल राऊंड हा रहदारीचा मुख्य रस्ता नियमानुसार केला जात नाही.नियमानुसार हा रस्ता २४ मीटरचा हवा होता परंतु काही ठिकाणी १८ मीटर तर काही ठिकाणी १२ मीटर चा केला आहे.
वास्तविक पाहता हा रस्ता मोठा होणे गरजेचे आहे.मात्र काही अतिक्रमणे वाचवण्यासाठी हा रस्ता लहान केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला .

हा रस्ता मोठा होण्यासाठी तोंडी व लेखी स्वरूपाची सूचना प्रशासनाला केली आहे.परंतु प्रशासन गांभीर्याने विषय हाताळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
येथील अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा रस्ता मोठा झाला पाहिजे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

(ता.१३) रोजी तडका हॉटेल समोर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन स्थानिक नागरिकांना बरोबर प्रशासनाच्या विरोधात दौंडकर जागे व्हा रस्ता रुंदीकरणासाठी एकत्र या दौंडकराच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणालाच नाही,अतिक्रमण काढा दुर्घटना टाळा,'तेरी भी चूप,मेरी भी चूप',मायबाप सरकार जागे व्हा,आमदार खासदार जागे व्हा दौंडकरांच्या जीवाशी खेळू नका अशा स्वरूपाचे फलक हातात घेउन घोषणा बाजी यावेळी करण्यात आल्या होत्या.

यावेळी भाजप किसान मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस वासुदेव काळे,
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान ,नगरसेवक राजेश गायकवाड , सचिन गायकवाड,राजेंद्र खट्टी,बबलू कांबळे,बादशहा शेख,ओसीम शेख,रुपेश होंकाडे,आबा होले, सचिन धोत्रे व आदी मान्यवर उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.