ETV Bharat / state

Sharad Pawar Waited Eknath Shinde : शरद पवार बसले मुख्यमंत्र्यांसाठी ताटकळत, मुख्यमंत्री पोहोचले अर्धा तास उशिराने - Vasantdada Sugar Institute

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री वेळेवर न आल्याने शरद पवार यांना ताटकळत बसावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला उशीर झाल्याने ते कार्यक्रम स्थळी उशिरा आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 21, 2023, 6:39 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे आपल्या वेळेला नेहेमीच किंमत देत असल्याचे अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळते. कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर पोहोचण्यासाठी राज्यात एखादा नेता असेल तर ते म्हणजे शरद पवार. वेळेच्या आधीच कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे चित्र अनेक कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळते. आजही याची प्रचीती आली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाली. या सभेला पवार वेळेवर हजर होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळेवर न पोहोचल्याने त्यांना अर्धा तास त्यांची वाट पहावी लागली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्धा तास उशिरा पोहोचल्यावर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला उशीर - वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यक्रम आणि पारितोषिक वितरण समारंभ हा 11 वाजता सुरू होणार होता.पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर यायला उशीर झाल्याने ते कार्यक्रमस्थळी उशिरा आले. तोपर्यंत मुख्य व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट पाहत होते.

विविध पुस्कारांचे वितरण - वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मांजरी बुद्रुक येथील कार्यालयात माजी केंद्रीय कृषीमंत्री तसेच संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार व संस्थेचे उपाध्यक्ष, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, तसेच संस्थेचे विश्वस्त प सदस्य व संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि साखर उद्योगातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. या सभेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२१-२२ मधील विविध पुस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - Eknath Shinde praised Sharad Pawar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले शरद पवारांचे कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.