पुणे : आज विविध संघटनांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या मिरवणुकी दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. शिवजयंतीची मुख्य मिरवणूक भवानी पेठेतील भवानी माता मंदिर येथून रामोशी गेट चौक, नेहरू रस्त्याने ए डी कॅम्प चौक, संत कबीर चौकातून, नाना चावडी चौकी, अरुण चौक, नाना पेठ चौकी ,अल्पना टॉकीज , डूल्ल्या मारुती चौक, हमजे खान चौक, सतरंजीवाला चौक ,तांबोळी मशीद चौक ,सोन्या मारुती चौक, फडके हौद चौकातून लहान महालापर्यंत जाणार आहे.
वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग : तसेच सेव्हन लव्हज चौकातून पावर हाऊसकडे जाणाऱ्याने बाहुबली चौक, रजाशबई गंगाळे पथ, जुना मोठा स्टॅन्ड,मार्ग जावे असे सांगण्यात आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यानंतर टिळक चौकाकडे जाणाऱ्याने नेहरू रोड, पावर हाऊस चौक, आपोलो टॉकीज, फडके हौद, जिजामाता जिजामाता चौका मार्गे, तसेच देवजी बाबा चौकाकडून मीठगंज चौक मार्ग स्वारगेट कडे जाणाऱ्याने देवजी बाबा चौक ते दारूवाला फुल आपोलो सिनेमा ते पावरा चौकातून नेहरू रस्त्याचा वापर करावा.
वाहतूकीचा बोजवारा उ़डू नये : गणेश रस्त्यावरील वाहतूक आवश्यकतेनुसार शिवाजी रोड मार्गे गाडगीळ पुतळा, बुधवार चौक मार्गे आपापल्या ठिकाणी जाता येईल. मिरवणूक मोती चौक, फडके हौद चौका पुढे गेल्यानंतर, वाहन चालक केळकर रस्त्याने, बुधवार चौक, पासोडा विठोबा मंदिर, मार्ग येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार आप्पा बळवंत चौक, बुधवार चौकातून ,वळून बाजीराव रस्त्याने शिवाजी रस्त्या मार्गे जाता येणार आहे. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकाने सं. गो बर्वे चौकातून पुणे मनपा भवन कडे जाणाऱ्या वाहन चालकाने स. गो बर्वे चौकातून, जंगली महाराज रस्त्याने झाशी राणी चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळे जावे. मिरवणुकीच्या मार्गावर दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास बंदी आहे. मुख्य मिरवणुकी व्यतिरिक्त शहरांमध्ये लष्कर खडकी भागात तसेच इतर भागात मिरवणुका निघणार आहेत.
आवश्यकतेनुसार बदल : आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. लष्कर भागातील मिरवणूक मार्ग खाण्या मारुती चौक, येथून ट्रायलक हॉटेल चौक, न्यू मोदीखान मार्ग, मुफ्ती चौकातून, उजवीकडे वळून कुरेशी मशीद, सेंट्रल स्टेटमेंट, भोपळे चौक, सेंट्रल स्टेट चौकी, आसूड खाना चौक, येथे मिरवणूक विसर्जित होईल, खडकी भागातील मिरवणूक मार्ग, शिवाजी पुतळा खडकी बाजार येथून सुरू होऊन कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौक, श्रीराम मंदिर, आसूड खाना चौक, फुले रोडने, नवी तालीम चौक, गोपी चौक, आंबेडकर चौक, टिकारा चौक, डीआर गांधी चौकातून, शिवाजी पुतळा येथे विसर्जित होईल.
हेही वाचा : bheed Trailer Released : भिड ट्रेलर रिलीज, कोविड लॉकडाऊनची खरी आणि भयावह कथा