पुणे : शिवराज्यभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त 'शिवराज्यभिषेक ग्रंथा'चं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ लेखक डॉ. सदानंद मोरे, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड आणि अनिल पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. (Shivaji Maharaj About First Navy) (Chhatrapati Shivaji Maharaj) (Shiva Rajyabhishek Program Pune) (Sharad Pawar On First Navy)
शिवचरित्राविषयी सखोलपणे बोलू शकतो : यावेळी शरद पवार म्हणाले की, शिवछत्रपती यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तासंतास बोलणारी लोकं हे आपल्या समोर आहेत. त्याचं चरित्र असं आहे की, प्रत्येक विषयावर आपण सखोलपणे बोलू शकतो. या देशात अनेक राजे होऊन गेले. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य वेगळं राज्य होतं आणि त्यांच्या राज्याला कोणी भोसलेंचं राज्य म्हटलं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सामान्य नागरिकाला संघटन करून केलेलं राज्य आहे.
ग्रंथाची कल्पना : यावेळी सदानंद मोरे म्हणाले की, शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या ग्रंथाची कल्पना आमचे मित्र अनिल पवार यांनी मांडली. त्यांच्याबरोबर चेतन कोळी, गणेश राऊत हे पण होते आणि ती मला खूपच आवडली. त्याच कारण असं की, एवढी महत्त्वाची घटना महाराष्ट्रामध्ये घडली तिचं महत्त्व फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा देशापुरतं नाही तर जागतिक पातळीवर आहे. त्याच्यावरती स्वतंत्र अशा प्रकारचा ग्रंथ नाही. त्या त्या काळात त्या त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या विचारसरणीप्रमाणे मत व्यक्त केली होती. बरेच वाद-विवाद त्यासंदर्भात झाले होते. परंतु या सगळ्या गोष्टींचा एक विवेक अशा प्रकारचा ग्रंथ आपल्याकडे नव्हता, ही फार मोठी पोकळी होती.
टिळकांची शिवजयंती सुरू करण्याचे कारण : लोकमान्य टिळकांनी जेव्हा शिवजयंती सुरू केली तेव्हा आपल्याकडे पूर्वी माणसांच्या जयंती करत नाही आणि माणसांच्या पुण्यतिथी करतात. त्यामुळे तोपर्यंत शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किंवा त्यांची जयंती साजरी करावी म्हणून लोकमान्य टिळकांनी ती सुरू केली. तेव्हा काही लोकांनी प्रश्न विचारला तेव्हा टिळक यांनी सांगितलं की, अनेक लोक प्रभू होऊन गेले. पण त्यांच्या कार्याला खूप काळ होऊन गेला. आमच्या समोर असा आदर्श पाहिजे जो आता घडला आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून त्यांचं जागर होणं गरजेचं आहे, असं त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. , असं सदानंद मोरे म्हणाले.
काय म्हणाले कराड? : यावेळी विश्वनाथ कराड म्हणाले की, भारत देशाचं संपूर्ण स्वरूप पाहिलं तर त्यात हिंदू राष्ट्र हा एक शब्द नवीन आला आहे. यापेक्षा हिंदवी स्वराज्याची कल्पना राबवणं महत्त्वाचं आहे आणि हा राजमार्ग आहे. कोणीतरी महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधित्व करावं आणि ते शरद पवार यांनी करावं.
1700 गावात शिवराज्याभिषेक : यावेळी निमंत्रक अनिल पवार म्हणाले की, 2016 ला आम्ही पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुण्यातल्या 1700 गावांमध्ये शिवराज्याभिषेक दिवस अत्यंत उत्साहात साजरा करावा असा प्रयत्न केला. त्यात आम्हाला यश मिळालं.
हेही वाचा: