ETV Bharat / state

Chhatrapati Sambhaji Raje : शिवाजी महाराजांबाबतची वादग्रस्त वक्तव्ये षडयंत्राचा भाग आहे का? - छत्रपती संभाजी राजे

छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) म्हणाले की, पिंपरी- चिंचवड शहरात बंद पुकारला आहे. आमची हीच भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे. मात्र महाराष्ट्र बंद होऊ नये या मताचा मी आहे. (Chhatrapati Sambhaji Raje on maharashtra bandh).

Chhatrapati Sambhaji Raje
Chhatrapati Sambhaji Raje
author img

By

Published : Dec 8, 2022, 5:43 PM IST

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा, त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. महाराजांबाबत वारंवार वक्तव्ये केली जात आहेत. हे एक षडयंत्र असल्याचा प्रश्न पडतो, असे छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आज पिंपरी- चिंचवड शहरात एक दिवसीय सर्वपक्षीय बंद पाळला गेला. यात छत्रपती संभाजी यांनी सहभाग घेतला होता. (Chhatrapati Sambhaji Raje on maharashtra bandh).

छत्रपती संभाजी राजे

कोश्यारी अजुनही महाराष्ट्रात कसे? : छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, पिंपरी- चिंचवड शहरात बंद पुकारला आहे. आमची हीच भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे. मात्र महाराष्ट्र बंद होऊ नये या मताचा मी आहे. ज्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला अशा व्यक्तीला अजून ही या महाराष्ट्रात कसे ठेवले आहे? राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला आहे. त्या राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करा, त्यांना बाहेर पाठवा असा निरोप दिला आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

भाजप, शिंदे गटाने बंदात सहभागी व्हायला हवं होतं : ते पुढे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर तीन जणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केलीत. यामागे काही षडयंत्र आहे का? असं वेळोवेळी का घडतय असा प्रश्न माझा या सत्ताधाऱ्यांना आहे. अशा प्रकारचे वक्तव्ये केल्यानंतर अनेक ठिकाणी त्या पदावरून राज्यपालांना हटवण्यात आले आहे. पण या राज्यपालांना का काढलं जात नाही? तुम्ही महाराष्ट्र बंद होण्यासाठी थांबला आहात का? महाराष्ट्र बंदचा प्रवास सुरु झाला आहे. पिंपरी, जालना ही सुरुवात आहे. अजून ही वेळ गेलेली नाही. लवकर निर्णय घ्या आणि या राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा. छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणा पलीकडील आहेत. पक्ष विसरून भाजप, शिंदे गटाने बंद मध्ये सहभागी व्हायला हवं होतं, अस देखील त्यांनी म्हटलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.