ETV Bharat / state

Chhagan Bhujbal Death Threat: धमकी प्रकरणावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले शरद पवार... - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री त्यांना धमकी देण्यात आली. या प्रकरणी धमकी देणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal Death Threat
छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 11, 2023, 11:31 AM IST

Updated : Jul 11, 2023, 11:38 AM IST

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

पुणे : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. काही आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहे तर काही आमदार हे शरद पवारांच्या बाजूने असल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ हे देखील अजित पवारांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतली आहे. अश्यातच राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आला आहे.

धमकी दिलेल्या तरुणाला अटक : धमकी दिलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आता भुजबळांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, अश्या धमक्या पवार कुटुंबीय कधीच देणार नाही. तसे काम ते करत नाही. धमकी देणे, जीवे मारणे असे शरद पवार तर अजिबातच करत नाहीत. वैचारिक लढाई ते करत असतात. भाषण करत असतात. अशा धमक्या अतिउत्साही लोकांमुळे येतात असे, भुजबळ म्हणाले.

धमकीचा कॉल : यावेळी भुजबळ पुढे म्हणाले की, माझा फोन माझ्या सहकाऱ्यांच्या जवळ होता. साधारणतः रात्री दहा ते साडे दहाच्या वेळेस धमकीचा कॉल आला. तेव्हा त्याने फोनवरून सांगितले की, मी भुजबळ यांना मारणार आहे. आम्ही सांगून मारतो म्हणून आम्ही कॉल केला आहे, असे त्यांनी सांगितले. तेव्हा आमच्या लोकांनी पोलिसांना कळवले. त्याला महाडमधून अटक करण्यात आली आहे. का अटक झाली? याचे कारण पोलीस शोधणार? असे यावेळी भुजबळ म्हणाले. तसेच सोशल मीडियावर जे कमेंट्स येतात, ते मी पाहत नाही, असे देखील यावेळी भुजबळ म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना माहीत आहे. तसेच विरोधी पक्ष नेता अधिवेशनात नेमला जातो. तो अधिकार अध्यक्षांना आहे. ते अधिवेशनात निर्णय घेतील, असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा :

  1. Chhagan Bhujbal Death Threat: छगन भुजबळांची सुपारी मिळाल्याने जीवे मारणार.. अटकेनंतर आरोपीने धमकीचे सांगितले कारण
  2. chhagan bhujbal Reaction: ...त्यांनी जे केले तेच मी केले, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
  3. NCP Political Crisis: शरद पवारांच्या सभेला छगन भुजबळ रॅलीने देणार उत्तर, नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

Last Updated : Jul 11, 2023, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.