पुणे - पुण्यातील औध, बाणेर रोड येथील सिंथ हीलिंग सोसायटीमध्ये ११ डिसेंबर रोजी चोरी झाली होती. २ किलो सोने तसेच ३ किलो चांदीची चोरी झाली होती. या घटनेचा तपास चतु:शृंगी पोलिसांकडून सुरू असून आतापर्यंत 43 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे 43 लाख 40 हजार 100 रुपये आहे.
या गुन्ह्या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीसांनी आत्ता पर्यंत 825.75 ग्राम सोने,1 हजार 605 ग्राम चांदी,1 होंडा शाईन, 2 व्हीलर, 3 घड्याळ, 2 कॅमेरा असा एकूण 43 लाख 40 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी 4 जणांना अटक केली असून 2 महिलांना जालना, बीडमधून अटक केली आहे. तर, यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून ८० तोळे सोन्याचे दागिने इतर वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच एका सोनारला देखीलअटक करण्यात आली आहे. समीर दयाल यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. पुण्यातील औंध बाणेर येथील सिंथ हीलिंग सोसायटी मध्ये 4 महिलांनी मिळून भिकारी असल्याचे बनाव रचत तब्बल १ कोटी रुपयांचे २०० तोळे सोन्याचे दागिने, 3 किलो चांदी चोरल्याची घटना 11 डिसेंबर रोजी घडली होती.
यात सोन्या चांदीच्या दागिन्यासह परदेशी चलन तसेच मौल्यवान किमतीचे घड्याळ, इतर वस्तू महिलांनी लंपास केले होते. याप्रकरणी पोलिसांनी २ महिलांना एका अल्पवयीन मुलाला जालना, बीडमधून अटक केली असून त्यांच्याकडून ८० तोळे सोन्याचे दागिने, इतर वस्तु जप्त केल्या आहेत. खुशबू गुप्ता, अनु आव्हाड, महावीर चपलोत, मदन वैष्णव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयाल यांचा बंगला पुण्यातील पाषाण भागात असणाऱ्या सिंथ हीलिंग सोसायटीमध्ये आहे. चोरी करणाऱ्या महिला या बीड तसेच जालना या जिल्ह्यातील असून या बंगल्याबाहेर त्यांनी अनेक वेळा येऊन भिकारी असल्याचं बनाव रचला होता. अनेक वेळा या महिला अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन या बंगल्यात भीक मागण्यासाठी जात असे. यावेळी गरीब असल्यामुळे बंगल्यातील काहीजण त्यांना अनेक वेळा दुपारी खाणं-पिण द्यायचे. याच गोष्टीचा फायदा घेत या महिलांनी या बंगल्याची रेकी केली. घरातील सगळेजण बाहेर कधी जातात, कधी परततात याची माहिती या महिलांनी जमवली होती.
११ डिसेंबर रोजी या महिलांनी घरात कोणी नसताना घराच्या मागील बाजूने बेडरूममध्ये प्रवेश करीत दागिन्यासह इतर वस्तू घेऊन पसार झाल्या होत्या. घरी परतल्यानंतर फिर्यादींना सगळा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली होती . पोलिसांनी परिसरातील जवळपास 150 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी महिलांचा शोध घेण्यासाठी बीड तसेच जालना जिल्ह्यात पथके रवाना केली होती. याप्रकरणी पोलिसांनी २ महिलांसह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर, टोळीतील एक पुरुषासह एका महिलेचा शोध सुरु आहे.