पुणे - सध्या सह्याद्रीच्या कुशीत जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे चासकमान जलाशय तुडुंब भरला आहे. या जलाशयाचे नयनरम्य रूप पर्यटकांना आकर्षित करत आहे. चारही बाजूने हिरवेगार डोंगर जलाशयाच्या सौंदर्य वाढवत आहेत.
भीमाशंकर वरून उगम पावणाऱ्या भिमा नदीवर चासकमान जलाशय उभा आहे. या जलाशयातून खेड व शिरूर तालुक्यात पिण्याचे व शेतीसाठी पाणी वापरले जाते. त्यामुळे चासकमान जलाशय तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. श्रावण महिन्यातील भीमाशंकरची यात्रा सुरू आहे. त्यामुळे भीमाशंकरला जाताना चासकमान जलाशयाचे हे रूप सध्या पर्यटकांसाठी पिकनिक पॉईंट बनत आहे.