पुणे - जुन्नर तालुक्यातील पाडळी गावात जमिनिच्या वादातून दोन गटात फ्रिस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात परस्परांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये इस्टेट एजंट व बांधकाम व्यावसायिक संतोष कबाडीसह 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात जुन्नर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बुट्टे आणि जुन्नर शहर भाजपचे अध्यक्ष गणेश बुट्टे यांचा देखील समावेश आहे.
शेतातील माल घरी आणण्यासाठी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. या दरम्यान रस्त्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गट एकोंएकांना भिडले. कोयते आणि काठ्याने मारहाण झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे.
संतोष कबाडी, आशुतोष कबाडी, प्रतिक नलावडे, प्रणित नलावडे, सुरेंद्र कबाडी, अनिता कबाडी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या गटात भाजप शहर अध्यक्ष गणेश बुट्टे यांच्यासह आकाश बुट्टे, रोहन बुट्टे, रोहित बुट्टे, शैलेश बुट्टे, प्रल्हाद बुट्टे, राजेंद्र शरद बुट्टे, शरद शंकर बुट्टे, आप्पासाहेब शंकर बुट्टे, प्रतीक जना बुट्टे, सुमित्रा गणेश बुट्टे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.