बारामती (पुणे) - शहरातील व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतिक प्रीतम शहा (वय ३०, रा. सहयोग सोसायटी बारामती) यांनी तक्रार दिली आहे.
दाखल तक्रारीनुसार जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (रा. भिगवण रोड, बारामती), जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे- देशमुख (रा. देशमुखवस्ती, पाटस रस्ता, बारामती), संजय कोंडीबा काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती), विकास नागनाथ धनके (रा. इंदापूर रोड, बारामती), मंगेश ओमासे (रा. सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (रा. खाटीक गल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (रा. अशोकनगर, जैन मंदिराशेजारी, बारामती), संघर्ष गव्हाळे (रा. बारामती), सनी उर्फ सुनील आवाळे (रा. खंडोबानगर, बारामती) या नऊ जणांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
असे घडले प्रकरण
सदर घटनेची हकीकत अशी की, मयत प्रीतम शशिकांत शहा यांना वरील नऊ जणांनी व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाच्या व्याज वसुलीसाठी तसेच बारामती शहरातील सह्योग सोसायटी येथील बंगला नावावर करून घेऊन मयत प्रीतम शहा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. असे आत्महत्येपूर्वी शहा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात सुसाईट नोट लिहून वरील नऊ जणांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार मयत प्रीतम शशिकांत शहा यांचा मुलगा प्रतिक शहा यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.
'सुसाईड नोट' सापडल्याने दिली तक्रार
मयत प्रीतम शहा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ती त्यांनी त्यांच्या लेंगरेकर ट्रेडींग कॉर्पोरेशन या दुकानात ठेवली होती. दिवाळीच्या पाडव्याला दुकान उघडल्यानंतर त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट शहा यांच्या कुटुंबीयांना सापडली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.
यांना अटक केली आहे
जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे- देशमुख, जयेश उर्फ कुणाल काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी,प्रवीण दत्तात्रय गालिंदे, सनी उर्फ सुनील आवाळे या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अद्याप तिघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे करत आहे.
पोलिसांनी केले आवाहन
दरम्यान, या घटनेनंतर वरील व्यक्तींकडून कोणाला व्याजाच्या पैशासाठी मानसिक त्रास होत असेल तर त्यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवर बारामतीत गुन्हा
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतिक प्रीतम शहा (वय ३०, रा. सहयोग सोसायटी बारामती) यांनी तक्रार दिली आहे.