ETV Bharat / state

निर्बंध कडक करा, पण लॉकडाऊन नको, चंद्रकांत पाटील यांची भूमिका - लॉकडाऊन चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया

गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू ( Chandrakant Patil talk on lockdown ) करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तरी चालतील, पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी बोलून दाखवली.

Chandrakant Patil talk on lockdown
लॉकडाऊन चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 5, 2022, 7:29 PM IST

पुणे - गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तरी चालतील, पण लॉकडाऊन नको ( Chandrakant Patil talk on lockdown ), अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली.

माहिती देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - Pune Bank Election: मला तिथे डाऊट होताच, माहिती घेऊन काय गडबड झाली हे पाहणार - अजित पवार

ही साथ संपण्याची शक्यता

चंद्रकांत पाटील म्हणाले की, निर्बंधांना विरोध नाही. पण, लॉकडाऊनला कोणी तयार होणार नाही. गेली दोन वर्षे विद्यार्थी, खेळाडू, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांनी खूप नुकसान सहन केले. हा मोठा कालावधी आहे. आता आणखी किती सहन करणार? हा सवाल आहे. त्यामुळे, राज्य सरकारने हवे तर कडक निर्बंध लावावेत. पण, सर्व काही बंद करण्याची भूमिका असू नये. तसेच, कोरोनाचे स्वरूप आता भयानक नाही आणि ही साथ संपण्याची शक्यता आहे, हे तज्ञांचे मतही सरकारने ध्यानात घ्यावे.

..मग बैठकांना उपस्थित राहण्याची औपचारिकता कशाला

पुण्यातील कोरोना आढावा बैठकांमध्ये आपण गेली दीड वर्षे उपस्थित राहिलो नसल्याबद्दल माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला. पण, त्या बैठकांमध्ये अरेरावी चालते. उपस्थितांच्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. अशा स्थितीत बैठकांना उपस्थित राहण्याची औपचारिकता कशाला, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल

शिवसेनेतील अस्वस्थता हळूहळू बाहेर पडू लागली आहे. काही शिवसैनिक खासगीत बोलतात तर, काही नेते उघड बोलतात. शिवसेना किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खऱ्या शिवसैनिकांना फार काळ दाबून ठेऊ शकणार नाहीत. शिवसेनेला खऱ्या हिंदुत्वाकडे जावेच लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राजकारणात कधीही काहीही होऊ शकते

शिवसेनेसोबत भाजपाची युती होऊ शकते का, असे एका पत्रकाराने विचारले असता, अशा शक्यतेबाबत आपल्याला काही माहिती नाही. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. पण, त्याबद्दल सांगता येत नाही. सामान्य माणसाची इच्छा आहे की, दोन भावांमध्ये भांडणे झाली तर, केव्हा तरी भांडणे संपवून पुन्हा जुने संबंध निर्माण करावे लागतात. तथापि, आपण युतीबद्दल काही बोलणार नाही. तसे बोलले की, लगेच शिवसेनेच्या मुखपत्रातून आपल्यावर सत्ता गेल्यामुळे झोप लागत नाही, अशी टीका होते. प्रत्यक्षात आपल्याला शांत झोप लागते, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

हेही वाचा - पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.