पुणे: महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की की शरद पवार हे पावरफुल नेते आहेत. तेच जर सावरकरांचे समर्थन करत नाहीत. अदानी प्रकरणात जेसीबी नको म्हणत आहेत. जर ते विरोधकांना पटत नसेल, तर विरोधक एकत्र येऊच शकत नाहीत. विरोधकांचे दात आणि नख गळून पडतील, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
पवारांशी चर्चा करेन-चंद्रकांत पाटील- राजकीय पातळी खालवली आहे. चंद्रकांत पाटलाने स्वतःला तपासून करावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. त्यावर पाटील म्हणाले, की, मी त्यांचा सल्ला मानलेला आहे. माध्यमातून नाही तर आपण एकत्र ,चहा पाण्याला बसू मी काही गोष्टी सांगतो .तुम्ही काही गोष्टी सांगा. कुठल्या योग्य ,कुठल्या अयोग्य ते सांगा. मी असे माध्यमात बोलणार नाही. परंतु मी पवारांशी चर्चा करेन, असेसुद्धा चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
आरएसएसने शेवटपर्यंत लढा नेला- चंद्रकांत पाटील म्हणाले, दीड दोन वर्षांनी विरोधक एकत्र राहत नाहीत, हेच मी म्हणत आहेत. पण ते आताच सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. भाजपविरुद्ध एकत्र लढणे सोपे नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे. अयोध्या ही सर्वांचीच आहे. अयोध्यातील राम मंदिरासाठीचा खरा लढा कोण लढला, हे सुद्धा सर्वांना माहीत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली दुर्गा वाहिनी ,विश्व हिंदू परिषद इत्यादी संघटनांनी हा लढा शेवटपर्यंत नेला. आज त्याला यश आलेले दिसते. संजय राऊत जे म्हणतात, अयोध्या आम्ही दाखविली. त्यात काही तथ्य नाही. बाबरी मशीद पडली तेव्हा सुद्धा संजय राऊत नव्हते. स्वतः मी होतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या अयोध्या दौऱ्यावर मंत्री पाटील यांनी दिलेली आहे.
टीका करण्याची गरज नाही- राज्यात सध्या अवकाळी पाऊस, दुष्काळ या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्या सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अयोध्याला गेल्याची विरोधकांकडून टीका होत आहे. त्यावर पाटील म्हणाले, की आता आधुनिक टेक्नॉलॉजी झालेली आहे. गाडीत बसून मी साइन करू शकतो. फाईल बघू शकतो. ते सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी इथे असताना केले. त्यानंतर तिथे जाईपर्यंत अचानक पाऊस आला. त्यामुळे तिथूनही सगळी सोय सरकार करेल. त्यामुळे त्यावर टीका करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.