पुणे : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना मी सांगू इच्छितो की - पी हळद आणि हो गोरी, असे होत नाही. मी पालकमंत्री होऊन दोन महिने झाले. सरकार येऊन चार महिने झाले. त्यामुळे तुम्ही अगोदर सरकारमध्ये होतात. पुण्याचा पाण्याचा प्रश्न, जो निर्माण झाला त्याबद्दल पालकमंत्री म्हणून मी दिलगिरी व्यक्त (Chandrakant Patil on Water problem due to rain) करतो. आणि मी याची चौकशी करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत, असे पुण्याचे पालकमंत्री व उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटले (Chandrakant Patil criticize to Ajit Pawar) आहे.
सरकार म्हणून जबाबदारी : पुण्यात पाऊस प्रमाणापेक्षा जास्त झाला तरीही नैसर्गिक आपत्ती असली तरीही सरकार म्हणून आमचे जबाबदारी आहे. तुम्ही निवडून दिलेले असल्यामुळे या जबाबदारीचे भान आम्ही ठेवलं पाहिजे. म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कलेक्टर आयुक्त पिंपरी चिंचवडच्याआयुक्तपीएमआरडीएच्या अधिकारी यांची एक आढावा बैठक घेणार आहे. त्याचबरोबर याचा अभ्यास घेत आहोत. की नेमकं पाणी का साचले ? आपण खड्डे बुजवले नाहीत का ? ड्रेनेजमध्ये काही अडचणी होत्या, तर त्याची चौकशी होईल. दोष आहे त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु यापुढे असं होणार नाही, यासाठी आढावा घेऊन योग्य ते निर्णय घेण्यात (Water problem due to rain Pune) येतील.
विरोधी पक्षावर टीका : एलअँडटीला आम्ही सांगितलेलं होतं, त्यांनी अहवाल दिला होता. त्याच्यावर सुद्धा काम चालू करावे. त्यांनी सुचवलेल्या सगळ्या कामांची सुरुवात करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ज्या दिवशी पाऊस झाला, त्या दिवशी मी रात्रभर जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त या सर्वांशी संपर्कामध्ये होतो. काम करत होतो, काही लोकांना रस्त्यावर उतरून काम केले तरच काम केल्यासारखं वाटतं, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली (Chandrakant Patil criticize) आहे.