पुणे- आमचे सरकार अजित पवार यांच्या सोबत स्थापन झाले, त्यावेळी अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्याचे बोलते जात होते. मात्र, ती एक रूटीन प्रोसेस होती. त्यात आमचा काहीच हस्तक्षेप नव्हता. मात्र, महाविकास आघाडीच्या सरकारने अजित पवार दोषी नाहीत, असा अहवाल दिला आहे. शिवसेनेनेही अजित पवारांवर आरोप केले होते. मग आता ते निर्दोष कसे? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा-पुण्यातील बारमध्ये बाऊन्सरचा गोळीबार; दारुचे बिल देण्यावरून वाद
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना मेजर पार्ट आहे. ज्यावेळी युती म्हणून अजित पवारांवर आरोप झाले त्यात शिवसेनाही अजित पवारांवर आरोप करीत होती. मात्र, आता अजित पवार निर्दोष कसे? असा खडा सवाल पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे. बुधवारी चंद्रकांत पाटील विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही, उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांनी 'यू टर्न' मारला. ते प्रत्येक गोष्टीत 'यू टर्न' मारतात.