ETV Bharat / state

Chandni Chowk flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे आज उद्घाटन; असे झाले उड्डाणपुलाचे काम, जाणून घ्या इतिहास

वर्षभरापासून पुणेकर चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याची वाट बघत होते. कारण या पुलाच्या कामामुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागला होता. आज या उड्डाणपुलाचे उद्धघाटन केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन
चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन
author img

By

Published : Aug 12, 2023, 11:24 AM IST

पुणे : गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या चांदणी चौकाच्या पुलाचे उद्घाटन आज केले जाणार आहे. केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. नवीन झालेल्या चांदणी चौकातील कामात 8 रॅम्प, 2 अंडरपास, 4 पूल, 2 सेवारस्ते आहेत. सुमारे 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमुळे चांदणी चौकाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. या प्रकल्पासाठी एकूण 865 कोटी रुपयांचा खर्च लागला आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील स्वायत्त संस्था आहे. या संस्थेतर्फे राष्ट्रीय राजमार्गांचा विकास देखभाल आणि व्यवस्थापन केले जाते. दरम्यान पुणे शहराच्या आसपासचे राष्ट्रीय महामार्ग विकसित करण्यात येत आहे. त्याबरोबर चांदणी चौक येथील एकात्मिक संरचना पुलांचे बांधकाम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत ईपीसी पद्धतीने करण्यात येत आहे.

वाहतूक कोंडी: एनडीए चौक (चांदणी चौक) हे पुणे शहरातील सर्वात गजबजलेले आणि महत्त्वाच्या रस्त्यांचे जंक्शन आहे. पुणे-बंगळुरु बायपासच्या हाय स्पीड वाहतुकीसह अनेक महत्त्वाचे रस्ते या चौकात एकत्र मिळतात. यामुळे चौकात सतत वाहतूक कोंडी होत असते. याच ठिकाणी एनडीए रोड, बावधन, पौड, कोथरूड, वेदभवन रस्ता आणि मुंबई आणि कात्रज येथून येणारे रस्ते जोडले जातात. चांदणी चौक परिसरातील वाहतूक ही अंदाजे 1 लाख 50 हजार पीसीयू आहे. सतत असणारी वाहनाची गर्दी व पायाभूत सुविधांची कमतरता ही वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे आहेत.

वाहतुकीची समस्या सुटली : सदर वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने मे एक्स सी सी या कन्सलटंटची 2013 मध्ये नेमणूक केली होती. महानगरपालिकेतर्फे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत कुठलाही बदल न करता इतर सर्व रस्त्याच्या सुधारणेचा प्रस्ताव तयार केलेला होता. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते, वाहतूक व राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार यांची भेट घेऊन हे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2014 च्या महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथील बैठकीत चांदणी चौक येथील एकात्मिक संरचना पुलांची बांधकामे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे करण्याचे जाहीर केले होते.

पुलाच्या कामाचा इतिहास : वर्ष 2017 मधील 22 मार्च रोजी पुणे महानगरपालिका, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व मे एक्स सी सी कन्सलटंट सोबत त्रिपक्षीय करार केला. त्यानंतर पुढील काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे करण्याचे ठरवण्यात आले. या करारनाम्यात प्रामुख्याने खालील गोष्टी अंतर्भूत आहेत.

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मे एक्स सीसी या कन्सलटंटने सुचविलेल्या डिझाईनमध्ये अनेक बदल करुन सदर बदलांची आयआयटी मुंबई मार्फत पडताळणी, तपासणी करुन घेतली.
  2. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वर्ष 2012 मध्ये ऑगस्ट महिन्यात प्रकल्प संचालक, भाराराप्रा, पोलीस आयुक्त, पुणे, पिंपरी चिंचवड, आयुक्त, पुणे महानगरपालिका व सर्व संबंधीत यंत्रणांची बैठक झाली. त्यांनी पुलाचे बांधकाम जेथे होणार त्या स्थळाची पाहणी करण्यात आली. त्यादरम्यान ज्या ज्या ठिकाणी प्रकल्पास अडचणी होत्या, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मुंबई - बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आधी अस्तित्वातील पूल पाडून महामार्ग सहापदरी करणे आवश्यक होते. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनांशी चर्चा करुन अस्तित्वातील जुना अरुंद पूल पाडून महामार्ग सहापदरीकरण करण्याचे ठरवण्यात आले.
  3. अस्तित्वातील ओव्हरपासवरील पाणी पुरवठा, विदयुत वाहिनी इ.सेवा वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी पुणे महानगरपालिका, डिफेन्स व इतर विभागास सेवा वाहिन्या स्थलांतराचे काम लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत कळविण्यात आले.
  4. राज्याचे मुख्यमंत्र्यांनी 2022मध्ये ऑगस्ट रोजी चांदणी चौक प्रकल्पास भेट दिली. त्यासोबत प्रकल्पाच्या अडचणी व उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालय,भारत सरकार यांनी 2 सप्टेंबर 2022 रोजी बैठक घेऊन चांदणी चौकातील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयी सूचना दिल्या.
  5. त्यानंतर 27 सप्टेंबर 2022 रोजी जुना पूल पाडण्यासंदर्भात सर्व संबंधीत यंत्रणेसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात सविस्तर चर्चेनुसार 1 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11 वाजेपासून वाहतूक बंद करण्यात आली. दुसऱ्या दिवसी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2022 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पूल पाडण्याचे अंतिम नियोजन करण्यात आले. त्यादिवशी 1 वाजता स्फोटकाद्वारे पूल पाडण्यात आला. महामार्गावरील मलबा उचलून लगेच मुंबई, सातारा-बंगळुरूकडे जाणारी वाहतूक पुर्ववत करण्यात आली.
  6. चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुणे सातारा महामार्गावरील वाहतूक 6 पदरी करण्यात आली आहे. दोन्ही बाजूस सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 8 वेगवेगळया रॅम्प्स (मार्गिका)ची निर्मिती करुन एनडीए चौकात येणारी सर्व बाजूची वाहतूक सिग्नल मुक्त करण्यात आली.
  7. जुना पूल पाडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन विस्तारीत पूल अत्याधुनिकपणे बांधण्यात आलेला आहे. चांदणी चौकातील सर्व कामे पूर्ण झाले असून वाहतूकीसाठी खुली करण्यात आलेली आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या : चांदणी चौकामधील पुलाच्या नावावरुन आता राजकारण होण्याची शक्यता आहे. चांदणी चौकाला हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिंदे गट शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी केली आहे. ते म्हणाले की, उद्या चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे उद्घाटन होणार आहे. पुणे शहरातील सर्वच शिवसैनिकांची मागणी आहे की या उड्डाणपूलाला 'हिंदू ह्रदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे.

हेही वाचा-

  1. Medha Kulkarni Post : भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; माजी आमदार मेधा कुलकर्णी नाराज
  2. Chandni Chowk: चांदणी चौकातील वाहतूक दररोज अर्धा तास बंद राहणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.