पुणे - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझर सारख्या अत्यावश्यक वस्तूंची मध्य रेल्वे 'इन-हाऊस' निर्मिती करीत आहे. ज्याचा उपयोग आरोग्य सेवा कर्मचारी आणि आवश्यक कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्यांसाठी करता येईल. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि परळ येथील कार्यशाळांमध्ये २,८३० मास्क आणि ३७५ लिटर सॅनिटायझर बनविण्यात आले आहे. मुंबई विभागात ५,७५० मास्क आणि १४५ लिटर सॅनिटायझर बनवण्यात आले आहे.
रेल्वेच्या इतर विभागातील आकडेवारी खालील प्रमाणे-
नागपूर विभाग - ३,००० मास्क आणि १,१५० लिटर सॅनिटायझर
सोलापूर विभाग - ३,००० मास्क आणि २४० लिटर सॅनिटायझर
पुणे विभाग - १,८०० मास्क आणि १६३ लिटर सॅनिटायझर
भुसावळ विभाग - ६,२०० मास्क आणि ६२० लिटर सॅनिटायझर
वाणिज्य, आरपीएफ, ऑपरेटिंग आणि मेकॅनिकल विभागातील रेल्वे कर्मचार्यांनी हे मास्क आणि सॅनिटायझर बनवले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.