ETV Bharat / state

केंद्र राज्याला देणार 1 हजार 121 'व्हेंटिलेटर' - केंद्रीय मंत्री जावडेकर - पुणे महत्ताची बातमी

महाराष्ट्रासाठी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये 1 हजार 121 व्हेंटिलेटरची व्यवस्था केंद्राकडून केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
author img

By

Published : Apr 10, 2021, 6:51 PM IST

पुणे - महाराष्ट्रासाठी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये 1 हजार 121 व्हेंटिलेटरची व्यवस्था केंद्राकडून केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती संदर्भात आज (दि. 10 एप्रिल) पालकमंत्री अजित पवार यांच्या सोबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आढावा बैठक घेतली, या बैठकीनंतर जावडेकर बोलत होते. यातील सातशे व्हेंटिलेटर हे गुजरातमधून तर 421 आंध्र प्रदेशमधून येणार आहेत.

बोलताना केंद्रीय मंत्री

ऑक्सिजनसाठीही केंद्राकडून सहकार्य

पुणे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार असल्याचेही जावडेकर म्हणाले. सध्याचे संकट हे राष्ट्रीय संकट आहे. जिथे ज्या गोष्टी कमी पडतील त्या पुरवल्या जातील यात कुठलाही दुजाभाव केला जाणार नसल्याचे जावडेकर म्हणाले.

केंद्राची 30 पथके महाराष्ट्रात दाखल

सध्या महाराष्ट्रात केंद्राची 30 पथके दाखल झाले असून विविध जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत. आढाव्यानुसार ते आपला अहवाल तयार करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले.

राज्यासाठी देण्यात आली एक कोटीपेक्षा जास्त लस

महाराष्ट्रात आतापर्यंत एक कोटी दहा लाख लसी देण्यात आले आहेत. त्यापैकी 15 लाख 63 हजार डोस सध्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. देशात महाराष्ट्रासह फक्त दोनच राज्यांना एक कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती देखील प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे; उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा - 'लसीकरणासारख्या विषयात राजकारण, आरोप-प्रत्यारोप व्हायला नको'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.