कोरेगाव -भिमा (पुणे) - 1 जानेवारी रोजी कोरेगाव भिमा येथे शौर्यदिन साजरा होत आहे. कोरोना महामारीचे संकट असल्याने प्रशासनाकडून योग्य नियोजन करुन प्रशासनाच्या सहकार्यातुन शौर्यदिन साजरा होईल. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळून शांतता राखण्याचे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले. आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली.
आनंदराज आंबेडकर यांनी विजयस्तंभाची केली पाहणी-
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला विजयस्तंभावर शौर्यदिनाचा अभिवादन कार्यक्रम साजरा होत असतो. यावर्षी कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे शौर्यदिन सोहळा कशा पद्धतीने साजरा होणार याकडे अनुयायांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभुमीवर कोरेगाव-भीमा येथे आनंदराज आंबेडकर यांनी भेट देऊन विजयस्तंभाची पाहणी केली.
शौर्यदिन शांततेत व संयमाने साजरा करण्याचे आवाहन-कोरेगाव भीमा येथे शौऱ्यदिन साजरा होत असताना जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणा नियोजनाला लागली आहे. शौर्यदिन शांततेत व संयमाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज आनंदराज आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाची पाहणी करून स्थानिक नागरिकांची याबाबत चर्चा केली
शौर्यदिनाचा कोरोनाचे संकट-
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचे संकट जगावर उभे राहिले आहे. राज्यसरकारने कडक धोरणं जाहीर करत रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरेगाव भिमा येथील शौर्यदिन साजरा करण्याच्या धोरणांची प्रशासकीय पातळीवर अंमलबजावणीची तयारी सुरु आहे.
हेही वाचा- मुंबईत सुरेश रैनासह ३४ जणांवर गुन्हा दाखल, मोठ्या सेलिब्रिटींचा समावेश
हेही वाचा- सदाभाऊंच्या किसान आत्मनिर्भर यात्रेविरोधात स्वाभिमानीची कडकनाथ यात्रा