ETV Bharat / state

Pune Crime: मोहोळ यांच्या नावाने मागितली तब्बल 3 कोटींची खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा - Construction Businessma

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Muralidhar Mohol
भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ
author img

By

Published : Mar 27, 2023, 1:52 PM IST

पुणे : शहरात विविध गुन्हे वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याचे माजी महापौर तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइलचा वापर केला आहे. तर युवा मोर्चाच्या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे सांगून आरोपींनी पैसे मगितल्याचे समजते. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला बोगस फोन असल्याचा संशय आला. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

नावाचा वापर करुन खंडणी मागितली: याबाबत पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोथरूड पोलिसांनी संदीप पिरगोंडा पाटील आणि शेखर गजानन ताकवणे वय ३५, राहणार भालेकर चाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे एक कार्यालय आहे. या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइलवर संपर्क केला. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या मावसभावाच्या नावाचा वापर केला. तसेच बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. हा प्रकार बांधकाम व्यवसायिकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला.

व्यवसायिकाला दिली होती धमकी : आरोपींकडून धमकी देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी बांधकाम व्यवसायिकाला दिली होती. या धमकीमध्ये आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात खंडणी धमकावणे माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: New Tital To Bacchu Kadu बच्चू कडू हे अपंग हृदयसम्राट नवीन उपाधी देत प्रतिमेला दुग्धाभिषेक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.