पुणे: व्याजाने खाजगी स्वरूपात घेतलेले पैसे परत देण्यासाठी घरावर गुंड पाठवून धमकावणे, शिवीगाळ करणे, तसेच जबरदस्तीने चेक घेणे (taking cheque under threat in Pune) यासाठी पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल (case registered against two men) करण्यात आलेला आहे. याप्रकरणी आरोपी बिलाल इसाक शेख (२६ वर्षे, रा. डॉल्फिन चौक, बिबेवाडी) याला सहकारनगर पोलिसांनी अटक (two arrested for threat Pune) केली.
शाळेची फी भरण्यासाठी घेतले होते कर्ज - बिलाल इसाक शेख, शहनाज शेख व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित सुनील बाळासाहेब धुमाळ (वय ४०) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. बाळासाहेब धुमाळ यांनी बिलाल शेख यांच्याकडून 30 टक्के व्याजाने 29 हजार 500 रुपये घेतले होते. कारण त्यांना त्यांच्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी पैशांची गरज होती.
धमकावत चेकही लिहून घेतला- या पैशाच्या बदल्यात जानेवारी 2022 पर्यंत 53 हजार 990 रुपये दिले. मात्र आरोपीने धुमाळ यांच्याकडे आणखी एक लाख वीस हजार रुपयांची मागणी केली. जेव्हा पीडितेने अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला तेव्हा गुंडांनी हे पैसे घेण्यासाठी त्याच्या घरी पाठवले. पीडितेला जीवाने मारण्याची धमकीही दिली. आरोपींनी सहकार नगर येथील डॉल्फिन चौकात धुमाळ यांच्याकडून जबरदस्तीने चाळीस हजार रुपयांचा धनादेश घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.