पुणे : पुण्यातील हाय प्रोफाईल व्यावसायिकाच्या केसमधील ( case of a high profile professional ) तपास अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde ) यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) यांना दिले. त्यानंतर ताबडतोब त्या अधिकाऱ्याची आता कंट्रोलमध्ये बदली करण्यात आलेली आहे.
वजीर शेख यांना तपासातून काढावे : पुण्यातील प्रसिद्ध स्टील व्यावसायिक राहुल गोयल यांच्या एका प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचे तपास अधिकारी म्हणून वजीर शेख हे तपास करत या प्रकरणात प्प्रहार चे नेते आणि आमदार बच्चू कडू याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राहुल गोयल या प्रकरणात कुठल्याही प्रामाणिक अधिकाऱ्यांकडून चौकशी करावे आणि आता जे जे तपास अधिकारी आहेत. वजीर शेख यांना तपासातून काढावे असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते.
राहुल गोयल प्रकरण : बच्चू कडूंच्या याच पत्रावर आता मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कार्यवाही करा, असे सांगितल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक वजीर शेख यांची आता पुण्यातील कंट्रोल रूमला बदली करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती अशी की, व्यावसायिक राहुल गोयल प्रकरणांत पुणे आर्थिक शाखेचे वजीर शेख हे तपास अधिकारी होते. परंतु त्यांची भूमिका ही संशयास्पद आहे आणि जाणून पूजन त्रास देणारी असल्याचे वाटते. त्यामुळे या प्रकरणात कुठल्याही प्रामाणिक अधिकाऱ्याने माझी चौकशी करावी अशी या व्यवसायिकांची मागणी आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर ताबडतोब कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत.
वजीर शेख आता कंट्रोलमध्ये : आमदार बच्चू कडू यांनी या प्रकरणांमध्ये व्यावसायिकाची भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगितली असे पत्र दिले. त्याच पत्रावर आता पुणे पोलीस आयुक्ताने ताबडतोब प्रकरणाचा प्रस्ताव तयार करावा आणि पुढील कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांना दिलेले आहेत. मुख्यमंत्री आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले अधिकारी वजीर शेख आता कंट्रोलमध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.