ETV Bharat / state

Daund Crime: कासव शिकार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; मांस भाजून खाण्यासाठी केली शिकार - Daund Forest Department

Daund Crime: दौंड तालुक्यातील वरवंड येथे कासवाची शिकार करून, कासवाचे कापून तुकडे केल्याप्रकरणी दौंड वन विभागाने दोघांना अटक केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना Daund Forest Department कासवाच्या शिकारीबाबत दूरध्वनीवरून माहिती मिळाली. यानंतर आरोपींच्या घराजवळ कासवाचे डोके आणि कवच आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. turtle poaching

Daund Crime
Daund Crime
author img

By

Published : Oct 19, 2022, 5:33 PM IST

दौंड दौंड तालुक्यातील वरवंड येथे कासवाची शिकार करून, कासवाचे कापून तुकडे केल्याप्रकरणी दौंड वन विभागाने दोघांना अटक केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कासवाच्या शिकरीबाबत दूरध्वनीवरून माहिती मिळाली. यानंतर आरोपींच्या घराजवळ कासवाचे डोके आणि कवच आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. अशी माहिती दौंड वनविभागाने Daund Forest Department दिली आहे. या प्रकरणी बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. turtle poaching

गुप्त माहिती मिळाली नाना धर्माजी सावंत व दादा नाना सावंत ( रा.वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दौंड तालुक्यातील वरवंड येथील वनपाल यांना भ्रमनध्वनीवरून गुप्त माहिती मिळाली होती. याबाबत दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या सूचनेनुसार दौंड वनपरिक्षेत्रातील वरवंड येथील कानिफनाथ नगर येथील सावंत यांच्या घराजवळ वनपाल वरवंड व वनरक्षक वरवंड हे गेले. त्यावेळी त्यांना नाना धर्मा सावंत यांचे घराच्या परिसरामध्ये नाना धर्मा सावंत हे मांसाचे तुकडे करताना दिसून आले. वनपाल वरवंड व वनरक्षक वरवंड यांनी त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, शेजारीलच एका फिकट निळया घमेल्यामध्ये कासवाच्या तोंडाचा तुकडा दिसून आला. तसेच शेजारी भिंतीच्या पलीकडे कासवाचे कवच दिसून आले होते.

मांसाचे तुकडे करून भाजून खाण्यासाठी शिकार वनपाल वरवंड व वनरक्षक वरवंड यांनी याबाबत नाना धर्मा सावंत यांच्याकडे अधिकची चौकशी केली असता. सदर कासवा जातीचा वन्यप्राणी दादा नाना सावंत यांनी घरी आणला असून, मांसाचे तुकडे करून भाजून खाण्याकरिता आणला असल्याचे सांगितले आहे.

कासव हा वन्यप्राणी भारतीय वन्यजीव अधिनियम, १९७२ चे अधिसूची Schedule 9 मधील Part २ चा वन्यप्राणी असलेने संबंधित आरोपी इसम दादा नाना सावंत व नाना धर्मा सावंत यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम, १९७२ चे कलम २,९,४४ ख व ५१ अन्वये वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे . राहुल पाटील (भा.व.से.) दिपक पवार, सहा. वनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वनगुन्हयाचा पुढील तपास चालू असल्याची माहिती दौंड वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.