पुणे- सरकारने सोमवारपासून सशर्त मद्य विक्रीला परवानगी दिली. यात मद्य दुकनासमोर सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रीनिंग आणि मास्क घालने बंदनकारक करण्यात आले आहे. मात्र, पुण्यात काही ठिकाणी याचे पालन झाले नाही. त्यामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सात मद्य विक्री दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- मुंबईतील नेपियन सी रोड परिसरातील इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग
जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या नियम व अटींचे पालन करुन वाइन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, पुण्यात मद्य विक्री वेळी नियमांचे पालन केले गेले नाही. मद्य प्रेमींनी दुकानाबाहेर मोठी गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. तर दारू दुकानदारांनी ग्राहकांचे थर्मल स्क्रीनिंग केले नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस नाईक बेंद्रे आणि करपे यांच्या पथकाने मद्य विक्री दुकानावर गुन्हा दाखल केला आहे.