ETV Bharat / state

बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त मिरवणूक, ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल - बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त मिरवणूक पुणे

कोरोना नियमांचे उल्लघन करत श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंती निमित्त मिरवणूक काढणार्‍या ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील ही घटना आहे.

pune
pune
author img

By

Published : Aug 20, 2021, 11:46 PM IST

पुणे - कोरोना नियमांचे उल्लघन करत श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली. मात्र, याप्रकरणी ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अध्यक्ष आनंद दवेंसह 25 जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी अध्यक्ष आनंद दवे, मनोज तारे, श्रीपाद कुलकर्णी, मयुरेश घाणेकर, विनोद जोशी, मदन सिन्नरकर व इतर २० ते २५ जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश तुर्के यांनी तक्रार दिली आहे.

बुधवारी (18 ऑगस्ट) श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त लाल महाल चौक ते शनिवारवाडा दरम्यान वाजंत्री, घोडा यांच्यासह मिरवणूक काढण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यामुळे शहरात निर्बंध आहेत. पण, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची कोणतीही खबरदारी न घेता लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - कोरोनानंतरही धोका कायम - डॉ. एम. देशमुख यांची खास मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.