ETV Bharat / state

भविष्यातील गरजा लक्षात घेत विकासकामे मार्गी लावा, अजित पवारांच्या सूचना

शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना ‍भविष्यातील गरजा लक्षात घेवून, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. अजित पवार यांनी आज (शनिवार) बारामती येथे विविध ‍ठिकाणी सुरू असणाऱ्या विकासकामांच्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी केली.

Carry out quality development work keeping in view the future needs Minister Ajit Pawar
भविष्यातील गरजा लक्षात घेवून विकासकामे मार्गी लावा, अजित पवारांच्या सूचना
author img

By

Published : Jul 4, 2020, 6:16 PM IST

बारामती (पुणे) - शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना ‍भविष्यातील गरजा लक्षात घेवून, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. अजित पवार यांनी आज (शनिवार) बारामती येथे विविध ‍ठिकाणी सुरू असणाऱ्या विकासकामांच्या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Carry out quality development work keeping in view the future needs Minister Ajit Pawar
भविष्यातील गरजा लक्षात घेवून विकासकामे मार्गी लावा, अजित पवारांच्या सूचना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची, माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रिडा संकुल, गौतमबाग येथे सुरु असणाऱ्या विकासकामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देत पहाणी करत आवश्यक सूचना केल्या. विविध विकासकामे सुरू असलेल्या ठिकाणी बारामतीच्या हवामानामध्ये ‍टिकून राहणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करावी. आसपासचा परिसर सुशोभित करावा, कामाच्या ‍ठिकाणी येणाऱ्या नागरीकांना प्रसन्न वाटावे अशा प्रकारचे वातावरण असावे, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.

अधिकाऱ्यांनी विकासकामांकरीता मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर वेळेत करावा, विकासकामे ही दर्जेदार असावीत तसेच आवश्यक असल्यास वाढीव निधीबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही अजित पावर यांनी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.