पुणे - भीमाशंकर अभयारण्य परिसरातील मदोशी घाटामध्ये अज्ञात व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. यामध्ये संबंधित मृत व्यक्ती महिला आहे की पुरुष, हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, त्या अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
भीमाशंकर रोडवर अभयारण्य परीसरातील मदोशी घाट हा मोठा घनदाट जंगल असलेला परिसर आहे. या परिसरामध्ये २-३ दिवस अगोदर अज्ञात व्यक्तीची जाळून हत्या केल्याची घटना घडली. आज सकाळच्या सुमारास मदोशी गावातील निवृत्त पोलीस अधिकारी जंगल परिसरात गेले. त्यावेळी संबंधित घटना त्यांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती राजगुरुनर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील तपास राजगुरुनगर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, यापूर्वीही या परिसरात अशाचप्रकारच्या २ घटन घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.