ETV Bharat / state

दौंडमधील बोरीपार्धी-केडगावात घरफोड्या वाढल्या, बंद सदनिकांचे कडी-कोयंडे तोडले

author img

By

Published : Dec 8, 2020, 1:42 PM IST

मध्यरात्रीच्या सुमारास बोरीपार्धी येथील आनंद हेरिटेजमध्ये चोर शिरले होते. ही बाब तेथील खाजगी सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ आसपासच्या रहिवाशांना पोलीस ठाण्यालाही संपर्क केला. मात्र, तोवर चोर चोरी करून पसार झाले. केडगाव, बोरीपार्धी या गावच्या परिसरात चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ६ घरे फोडल्यानंतर आता आणखी घरफोड्या चोरट्यांनी केल्या.

बोरीपार्धी-केडगावात घरफोड्या वाढल्या
बोरीपार्धी-केडगावात घरफोड्या वाढल्या

दौंड (पुणे) - बोरीपार्धी-केडगाव (ता. दौंड) येथील आनंद हेरिटेजमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी बंद असलेल्या सदनिकांमध्ये चोऱ्या केल्याची घटना घडली आहे. यात चोरट्यांनी छोट्या-मोठ्या घरगुती वस्तू चोरल्या. चार दिवसांपूर्वी केडगाव येथे ६ घरांचे दरवाजे तोडून चोरी झाली होती. यामुळे चोरांचा बंदोबस्त करण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर आहे.

सविस्तर वृत्त असे की, मध्यरात्रीच्या सुमारास बोरीपार्धी येथील आनंद हेरिटेजमध्ये चोर शिरले होते. ही बाब तेथील खाजगी सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ आसपासच्या रहिवाशांना पोलीस ठाण्यालाही संपर्क केला. मात्र, तोवर चोर चोरी करून पसार झाले. केडगाव, बोरीपार्धी या गावच्या परिसरात चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ६ घरे फोडल्यानंतर आता आणखी घरफोड्या चोरट्यांनी केल्या. काल झालेल्या घरफोड्यांमध्ये किरकोळ स्वरूपाची चोरी झाली.

हेही वाचा - उत्तन पोलीस ठाणे हद्दीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड

मागे झालेल्या घरफोड्या

याआधी काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. शिवसेना कार्यकर्ते राजेंद्र मासाळ याच्या फ्लॅटला दोन दरवाजे असल्यामुळे एक दरवाजा त्यांनी कायमचा कुलूप बंद केला होता. चोरट्यांना घर बंद आहे असे वाटल्यामुळे त्यांनी तोच दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मासाळ यांना जाग आल्यामुळे त्यांनी शेजारी असणारे कैलास शेलार, बाळासाहेब शितोळे, सालम शेख यांना जागे केले. नागरिक एका ठिकाणी गोळा झाले. केडगाव पोलिसांना देखील त्यावेळी फोन करून बोलवण्यात आले होते. तोपर्यंत चोरटे धूम ठोकून निघून गेले होते.

दागिने आणि टीव्ही चोरीला

त्याचबरोबर बोरीपार्धी येथील घटनेत श्रीपत खंडाळे या शिक्षकाच्या घरी चोरी झाली. त्यामध्ये दागदागिने व एक टीव्ही चोरीला गेला. चोर टीव्ही घेऊन जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

बंद सदनिकांचे कडी-कोयंडे तोडले

वेदश्री आपारमेंट, केडगावमध्ये किरण लाटकर यांच्या फ्लॅटमधून कपाटातून वीस हजार रुपये चोरट्यांनी काढून घेऊन गेले. तर, आणखी एक नागरिक दीपक भुजबळ तसेच, गिरीजा शंकर सोसायटीमधील शिक्षक दिलीप खवळे, विकास दिवेकर यांच्या बंद सदनिकांमध्ये देखील चोरट्यांनी दरवाज्याचे कडी-कोयंडे तोडले. मात्र, त्यांच्या काहीही हाती लागले नव्हते. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस हवालदार सचिन जगताप आणि पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सुशिक्षित गुन्हेगारांची वाढती संख्या, चिंतेचा विषय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.