ETV Bharat / state

बैलगाडी शर्यतीवरील बंदी झुगारून गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात बैलगाडी शर्यतीचे आयोजन - आंबेगावात बैलगाडी शर्यतीचे आयोजन

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात बंदी झुगारून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग आणि गिरवली गावात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले.

bullock cart race
बैलगाडी शर्यत
author img

By

Published : Nov 5, 2021, 7:08 PM IST

पुणे - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात बंदी झुगारून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग आणि गिरवली गावात या शर्यतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण करत बैलगाडा मालक, तरुणाई आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आयोजनाकडे पोलीस प्रशासनाने मात्र साफ दुर्लक्ष केले असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा - बाबा केदारनाथ आणि हिमालयातील उंच शिखरे केदारनाथला मला खेचून आणतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष -

बैलगाडी शर्यतीवर बंदी असून यासंदर्भात न्यायालयीन लढाई सुरू आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील चोरून-लपून मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतीचे आयोजन आंबेगाव तालुका परिसरात होताना पाहायला मिळत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते.

तीन महिन्यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाडी शर्यती संदर्भात नोंदविण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन स्थानिक बैलगाडी शर्यत प्रेमींना दिले होते. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही. असे असताना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडी शर्यतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.या बैलगाडी शर्यतीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा झाले होते.

कोरोना नियमांचे उल्लंघन -

यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारकडून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात झाल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा - कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवारांची पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थिती; शरद पवारांचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.