ETV Bharat / state

Brother Sexually Abused Minor Sister : 'भैयाने गंदा काम किया'; युट्युबवरील व्हिडिओ पाहून बहिणीवर लैंगिक अत्याचार

वडिलाकडील मोबाईलवर युट्युबवर अश्लील व्हिडिओ पाहून 12 वर्षीय भावाच्या मनात अश्लीलता निर्माण झाली. त्यांनतर, ऑगस्ट महिन्यात घरात कोणी नसताना तीन वर्षीय बहिणीवर भावाने अत्याचार ( Brother Sexually Abused Minor Sister ) केला होता. भैयाने गंदा काम किया अस वारंवार चिमुकली म्हणत असल्याने मुलावर संशय बळावला होता.

Brother Sexually Abused Minor Sister
युट्युबवरील व्हिडिओ पाहून बहिणीवर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Dec 3, 2021, 3:23 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये भाऊ आणि बहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणी 12 वर्षीय मुलाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडिलाकडील मोबाईलवर युट्युबवर अश्लील व्हिडिओ पाहून भावाच्या मनात अश्लीलता निर्माण झाली. त्यांनतर, ऑगस्ट महिन्यात घरात कोणी नसताना तीन वर्षीय बहिणीवर भावाने अत्याचार ( Brother Sexually Abused Minor Sister ) केला होता. दरम्यान, मुलीला त्रास होत असल्याने चिमुकलीला दवाखान्यात घेऊन जाण्यात आले तेव्हा ही गंभीर बाब समोर आली आहे.

'भैयाने गंदा काम किया'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्षीय मुलगा हा वडिलांकडे असलेल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ बघत असे. त्यांच्यामुळे त्याच्या मनात अश्लीलता निर्माण झाली होती. यातूनच ऑगस्ट 2021 मध्ये घरात कोणी नसताना तीन वर्षीय बहिणीवरच त्याने लैंगिक अत्याचार केला. त्याच महिन्यात आईला कोरोनाची बाधा झाल्याने त्या त्यांच्या मूळगावी गेल्या होत्या. तिथे मुलीची तब्बेत बरी नसल्याने तेथील डॉक्टरांकडे गेल्या. दरम्यान, डॉक्टरांनी औषध उपचार करून पाठविले. काही दिवसांनी त्या पिंपरी-चिंचवडमध्ये परतल्या, तेव्हा देखील मुलीची तब्बेत बरी नव्हती. महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात तिला दाखवण्यात आले, तेव्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पुढे आले. भैयाने गंदा काम किया असे वारंवार चिमुकली म्हणत असल्याने मुलावर संशय बळावला. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी विचारले असता हे कृत्य त्यानेच केले असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - Minor Girl Abuse : अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सोशल मीडियावरील चॅटिंगमधून घडला प्रकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.