पुणे - बालभारतीने ( BalBharati ) इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकात ( Marathi Textbook of Class IV ) 'ईदगाह' या धड्याचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाठ्यपुस्तकातील धड्यावरून सोशल मीडियात उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने ( Brahmin Federation ) पाठ्यपुस्तकातून हा धडा वगळावा, अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
चौथीच्या पुस्तकात एक ईदगाह नावाचा धडा आहे आणि हा धडा विविष्ठ समाजाचे संबोधन करणारा असून बालभारतीच्या पुस्तकात एका धर्माबद्दल धडा कसा असू शकतो? असा सवाल या संघटनेने केला आहे. विशिष्ठ धर्माचे सण, चालीरीती का शिकवले जात आहे. त्याचा अभ्यास आम्हाला का करावा लागत आहे? आपण जर आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष म्हणून म्हणत असाल, तर मग याच पुस्तकात गीता, दिवाळी, दसरा, वेद मंत्र यांचा अभ्यास का नाही ? असे प्रश्न अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विचारले आहे. हा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा, अशी मागणीही ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.
'धडा वगळण्याची मागणी चुकीची'
दुसरीकडे ईदगाह हा धडा आपल्या देशातील बहुविविधता ही सुंदरता दर्शवते. त्यामुळे आपल्याला धर्म, संस्कृतीची माहिती व्हावी, या उद्देशाने हा धडा असावा. विविष्ठ धर्माचा प्रचार आणि प्रसार असा कोणताही हेतू यातून वाटत नाही. त्यामुळे धडा वगळण्याची मागणी पूर्णपणे चुकीची आहे, असे मत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - ETV Bharat Special News : शाळकरी मुलाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय; भाजी विक्रीतून देतोय व्यसनमुक्तीचा संदेश