लोणावळा (पुणे) - वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणांचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना लोणावळा परिसरातील कुसगाव येथे घडली आहे. मृतामध्ये वाढदिवस साजरा होऊन गेलेल्या तरुणांचा समावेश आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरातील कुसगाव येथे वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी आकाशसह चारजण आले होते. नुकताच आकाशचा वाढदिवस झाला होता. दरम्यान, लोणावळा परिसरात पर्यटन करत असताना आकाश आणि धिरेंद्र हे दोघे घाणीत पोहण्यासाठी उतरले होते. तेव्हा, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली असून तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती. आकाश आणि धिरेंद्र यांचा मृतदेह शिवदुर्ग टीमने बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. खाणीतून मृतदेह काढण्यासाठी शिवदुर्ग च्या राजेंद्र कडू , सागर कुंभार, रोहित वर्तक, इंद्रनील खुरंगळे, अनिल सुतार, प्रणय अंबुरे, सुनील गायकवाड, आनंद गावडे, अजय शेलार, अमोल परचंड, रितेश कुरतडकर, महेश मसणे, समीर जोशी, हनुमंत भोसले, मधुर मुंगसे,आशिष कोरहाळकर, लक्ष्मण चौगुले, अशोक उंबरे, राहुल देशमुख या सदस्यांनी मदत केली.