ETV Bharat / state

Pune Crime : धक्कादायक! पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी; पोलिसांनी हैदराबादमधून एकाला घेतले ताब्यात - हैदराबादमधून एकाला ताब्यात घेतले

पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन प्रापत झाला होता. या फोन कॉलमुळे गुगलचे ऑफिस असणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात एकच खळबळ उडाली होती. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगलमध्ये बॉम्ब असल्याचा फोन करण्यात आला होता. गुगलच्यावतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. गुन्हेगाराचा तपास लागला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

Google office
गुगल ऑफिस
author img

By

Published : Feb 13, 2023, 11:11 AM IST

Updated : Feb 13, 2023, 2:28 PM IST

पुणे : मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ असा धामिकाचा निनावी कॉल करण्यात आला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठलीही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. त्यानंतर पोलीस हैदराबादला रवाना झाले आहे. पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैद्राबादमधील एका व्यक्ती : बीकेसी येथील गुगल इंडियाच्या दूरध्वनीवर रविवारी दूरध्वनी आला होता. शिवानंदने केलेल्या या दूरध्वनीत त्याने पुणे गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. याबाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पुणे पोलिसांना याबाब माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तेथे तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. अखेर त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले. गुगलच्यावतीने दिलीप तांबे यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धमकीची तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवानंदविरोधात ५०५ (१) (ब) व ५०६ (२) अंतर्गत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता दूरध्वनी हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार बीकेसी पोलिसांचे एक पथक हैद्राबादला रवाना झाले आहे.

मुंबई पोलीस सहआयुक्तांना फेक फोन कॉल : रविवारी मध्यरात्री मुंबई पोलीस सहआयुक्तांना दोन वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे, असे त्याने सांगितले. तसेच तेथे घटनास्थळी तातडीने पोलीस पाठवण्यास सांगितले. पोलीस सहआयुक्तांनी त्याला अधिक विचारणा केली असता त्याने अपशब्द वापरून फोन कट केला. सहपोलीस आयुक्तांनी ही माहिती मुंबई पोलीस नियंत्रणाला दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ मीरा भाईंदर पोलीस नियंत्रणेला माहिती दिली. याप्रकरणी मीरा भाईंदर पोलीस आणि मुंबई पोलीस हे दोन्ही तपास करत आहेत.

हेही वाचा : Sarojini Naidu Birth Anniversary : भारताच्या नाइटिंगेल सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो 'राष्ट्रीय महिला दिन'

Last Updated : Feb 13, 2023, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.