पुणे - सदाशिव पेठेतील एका जुन्या घरात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही. चार ते पाच दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्य झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झालाची शक्यता -
सदाशिव पेठेतील ब्राह्मण मंगल कार्यालयाशेजारी एक जुनी इमारत आहे. या इमारतीच्या आतील बाजूस काम सुरू असल्यामुळे इथे कुणी राहत नव्हते. मागील तीन दिवसांपासून या इमारतीतून उग्र वास येत होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, त्यांना अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यावर अळ्या पडल्या होत्या. मृतदेहाची स्थिती पाहता चार ते पाच दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - पूर्ण नियोजन करूनच पाठवण्यात आली लस; विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली माहिती