ETV Bharat / state

भाजपच्या टारगेटवर आता बारामती, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपच जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास - २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपच जिंकणार

बारामतीचा गड २०२४ ला (2024 Lok Sabha elections) भाजपने जिंकलेला दिसेल, (BJP will win in Baramati 2024 Lok Sabha) असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. देशात असे अनेक गड उद्धवस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होते, संघर्ष निर्माण करण्याची ताकद येते. त्यावेळी चांगले-चांगले गड उद्धवस्त झाले आहेत. गड कोणा एकाच्या मालकीचा राहत नाही. कोणाचे वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार बदल होतो. हा देशाचा इतिहास आहे.

२०२४ लोकसभा निवडणुकीत भाजपच जिंकणार, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

author img

By

Published : Sep 6, 2022, 5:18 PM IST

बारामती - बारामती पवारांचा गड मानला जातो. परंतु देशात असे अनेक गड उद्धवस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होते, संघर्ष निर्माण करण्याची ताकद येते. त्यावेळी चांगले-चांगले गड उद्धवस्त झाले आहेत. गड कोणा एकाच्या मालकीचा राहत नाही. कोणाचे वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार बदल होतो ( BJP will win in Baramati 2024 Lok Sabha ). हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे बारामतीचा गड २०२४ ला भाजपने जिंकलेला दिसेल ( 2024 Lok Sabha elections ), असा आशावाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

देशात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची मोट बांधली जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो. परंतु राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर आठ जागांच्या वर हा पक्ष गेलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु म्हणून ओळखले जातात. जगातील १५५ देशांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. २१ व्या शतकातील मजबूत भारत बनविण्याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. विरोधकांकडे फक्त राजकीय व्हिजन आहे. त्यातून त्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. परंतु मोदी हे देशासाठी काम करत आहेत. जो राष्ट्रासाठी काम करतो. त्यांच्या मागे जनता राहते हे राहते, असेही बावनकुळे म्हणाले.

बारामतीच्या दौऱ्याचीची सुरुवात पवारांच्या काटेवाडी गावापासून करत असल्याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, प्रत्येक बुथवर पदाधिकाऱ्यांनाना ताकद मिळाली पाहिजे. यासाठी काटेवाडीत जात आहे. दिवसभरात अनेकांना भेटणार असून जनतेची निवेदने स्विकारून ती सरकारकडे पाठवणार आहे. बावनकुळे हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपिचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती.

बारामतीत प्रत्येकाला यावंसं वाटत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, सुळे काय म्हणाल्या हे मला माहिती नाही. परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामती दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात खासदार म्हणून सुळे त्यांना भेटू शकतात. बारामतीसह राज्यातील सर्व जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची संघटना वाढवणे, ताकद वाढविणे, उमेदवार निवडून आणणे ही पक्षाची जबाबदारी आहे. आमचा पक्ष जगातील व देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीची जागा जिंकायची हा आमचा निश्चय आहे. त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वारंवार प्रशंसा करत असताना बारामती टार्गेट का, या प्रश्नावर ते म्हणाले, एखाद्याने चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय. परंतु बारामती मतदारसंघात अजूनही ४५ टक्के जनता उपेक्षित आहे. ओबीसी, मराठा, धनगर समाजाचे प्रश्न कायम आहेत. चार-दोन लोक मोठे झाले म्हणजे समाज मोठा होत नाही. उपेक्षित एकत्र आल्यावर संघर्ष निर्माण होतो.आणि हा संघर्ष विजयापर्यंत घेवून जातो. ते काम आम्ही करू. देशातील अनेक गड उद्धवस्त झाले. त्याचा निर्णय जनता घेत असते. डाॅ.अब्दुल कलाम यांचे व्हिजन पुढे घेवून जाण्याचे काम मोदी करत आहेत. देशाला सुरक्षित व मजबूत तेच करू शकतात, हे जनता जाणते. त्यामुळे असे अनेक किल्ले उद्धवस्त होतील. बारामती हा त्या दृष्टीने फार मोठा किल्ला नाही.

मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बारामती मतदारसंघाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांनी गणेशाचे दर्श घेत राज्याची संघटनात्मक बैठक घेतली असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.