ETV Bharat / state

Chandrasekhar Bawankule On Sanjay Raut : स्वतःहा ढोंग रचलेल्या व्यक्तीने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये; चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊतांवर टीका - BJP state president Chandrashekhar Bawankule

स्वतःहा ढोंग रचलेल्या व्यक्तीने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये असा हल्लाबोल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. यांचा ढोंगीपणा उघड झाला असून यांनी अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतांना नामाकरणाचा प्रस्ताव का मंजूर केला नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

Chandrasekhar Bawankule
बावनकुळे यांची संजय राऊतांवर टीका
author img

By

Published : Feb 16, 2023, 7:15 PM IST

बावनकुळे यांची संजय राऊतांवर टीका

पुणे : उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार जोरदार टीका केली आहे.

ढोंगी पणा जाहीर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान केले आहे. ते म्हणाले की स्वतःहा ढोंग रचलेल्या व्यक्तीने दुसऱ्याला ढोंगी म्हणू नये. यांचा ढोंगी पणा जाहीर झाला आहे. बहुमत नसलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडला. पण अडीच वर्ष सरकारमध्ये असताना का निर्णय घेतला नाही. शिंदे फडणवीस सरकार लवकरच प्रस्ताव मंजूर करून घेणार असे यावेळी बावनकुळे म्हणाले. आज पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.

निवडणुक प्रतिष्ठेची : काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंग बाबत विचारले असता ते म्हणाले की काल झालेल्या बैठकीत कुणीही उद्योजक नव्हते. मी देवेंद्र फडणवीस, कोअर ग्रुपचे मेंबर होते. ही औपचारिक बैठक होती. यात देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. भाजप प्रत्येक निवडणुकीत आपली ताकद आजमावत असतो. जेव्हा निवडणूक असते तेव्हा ती पक्षासाठी प्रतिष्ठेची असते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्ता जे करतो तेच या निवडणुकीत आम्ही करीत आहे, वेगळे काहीच नाही, असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले.

भाजपात कोणीही नाराज नाही : भाजपचे नेते संजय काकडे हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की आमच्यात नाराज कोणीच नाही. संजय काकडे पहिल्यापासून माझ्यासोबत आहेत. संजय काकडे यांच्यावर कोणी नाराज नाही. हा भाजप पक्ष आहे. कोणावरही शंका व्यक्त करणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

एखाद्याला मारहाण करणे योग्य नाही : जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणा बाबत बावनकुळे म्हणाले की, पोलीस यंत्रणा योग्य तपास करतील. जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार केली असेल तर, शासन योग्य पद्धतीने तपास करेल, असे देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्या परिवाराला धमकी आली असेल तर ते गृहमंत्र्यांशी बोलू शकतात. पण कायदा हातात घेणे हा मार्ग नाही. जे आरोपी आहेत त्यावर पोलीस कारवाई करतील. पण घरात जाऊन एखाद्याला मारहाण करणे याचा समर्थन होणार नाही. आव्हाड आमदार आहेत ते गृहमंत्र्यांशी कधीही बोलू शकतात. पण, मारहाण करणे नेहमीच त्यांनी त्यांच्या भूमिकेत येत हे योग्य नाही.

गिरीश बापट नाराज नाही : यावेळी बापट यांच्या बाबतीत विचारले असता ते म्हणाले की गिरीश बापट नाराज नाही, ते आमचे नेते आहेत. आता ते आजारी आहेत अशा अवस्थेत त्यांनी प्रचाराला यावे अशी तुमची इच्छा आहे का ? त्यांची कोणतीही नाराजी नाही आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहोत. बापट यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. मीडियाला विनंती आहे तुम्ही अशा बातम्या चालवू नका आणि व्यक्तिगत कुणावर बोलू नका असा सल्ला देखील यावेळी बावनकुळे यांनी दिला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत संवेदनशील : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत बावनकुळे म्हणाले, सरकार हे संवेदनशील आहे. महाविकास आघाडीने तर वर्षभर पगार केले नव्हते. सरकार लवकरच निर्णय घेईल. कसबा पोटनिवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. यावर बावनकुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री नंतर आधी कार्यकर्ते आहेत. प्रत्येक कार्यकर्ता प्रचाराला येतो. तसेच फडणवीस येत आहे असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा - Shinde Thackeray Row : शिंदे सरकारला दिलासा; सुप्रीम कोर्टाने सत्तासंघर्ष खटल्याचा निकाल ठेवला राखून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.