ETV Bharat / state

मोदींकडे बघा ते 22 तास काम करतात; दुपारच्या झोपेवरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना चिमटा

पुणेकरांनो पंतप्रधान मोदी यांच्याकडे बघा ते 22 तास काम करतात, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना टोला मारला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

chandrakant patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Oct 24, 2020, 5:47 PM IST

Updated : Oct 24, 2020, 6:59 PM IST

पुणे - पुणेकरांच्या झोपेबद्दल कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज टिपण्णी केली आहे. पुणेकरांनो पंतप्रधान मोदी यांच्याकडे बघा ते 22 तास काम करतात, असे ते म्हणाले. काहीजणांना दुपारची झोपण्याची सवय असून, ती पुणे परिसरात जास्त आहे. दुपारी एक ते चार काही सांगू नका, मोदींकडे बघा ते 22 तास काम करतात, अशी टिपण्णी चंद्रकांत पाटील यांनी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

हेही वाचा - जळगाव: सुवर्णनगरी गजबजली! दसर्‍याच्या मुहूर्तावर सोने खरेदीकरता ग्राहकांची गर्दी

एकही भूकबळी नाही

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुण्यातील कोथरूड विधानसभेची निवडणूक हरावी म्हणून अनेकांनी सुपारी गणपती पुढे ठेवली. पण, मी विजयी झालो. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, कोरोनाने आपल्याला खूप शिकवले, आयुष्य क्षणभंगूर आहे. 130 कोटी लोकसंख्याचा देश, एक माणूस भूकमारीने गेला नाही. यामुळे संपूर्ण जग आश्चर्य करत. 130 कोटींचा देश पाच-सहा वेळेस लॉकडाऊन होतो. मात्र, एकही भूकबळी यामुळे गेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मोदी यांनी असे ठरवले की, 2022 ला देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होतील.

देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार पक्के घर

तेव्हा, देशातील प्रत्येक नागरिकाला पक्के घर द्यायचे असे लक्ष ठेवले होते. सध्या दोन कोटी घरं पूर्ण झाली आहेत. विविध काम करण्यासाठी निवडून यायचे असते, नाहीतर सहा वेळेस आमदार होऊन काही उपयोग नाही. लक्ष आपल्या आयुष्यात ठरवायची असतात. जे पंतप्रधान मोदी यांच्याकडून बघून शिकले पाहिजे. मोदी कधी टीकेची काळजी करत नाहीत. कितीही टीका करा, ते सरळ चालत असतात. आयोध्येमध्ये काही जणांनी टीका केली. कोरोना आहे 'ई' भूमिपूजन करा असे काहीजण म्हणत होते. माज ते गेले आणि भूमिपूजन करून परत आले. रात्री झोपताना आपल्याला समाधान असले पाहिजे की, चुकीची गोष्ट केलेली नाही. सर्व जग त्यांचे नेतृत्व मानायला लागले आहे. त्यांना आपण फॉलो करू शकतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचा - मुंबईत महिलेची ट्रॅफिक पोलिसाला मारहाण... व्हिडीओ व्हायरल!

पुणेकरांनी पंतप्रधानांकडून शिकले पाहिजे

मोदीजी विचलित होत नाहीत. ते 22 तास काम करतात. तसेच तुम्ही न झोपतासुद्धा राहू शकता. त्या दिशेने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. काही जणांना दुपारची झोपण्याची सवय असते. पुणे परिसरात जास्त आहे. दुपारी एक ते चार काही सांगू नका. मोदींकडे बघा ते 22 तास काम करतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना लगावला आहे.

Last Updated : Oct 24, 2020, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.