ETV Bharat / state

Mukta Tilak Funeral : भाजप आमदार मुक्ता टिळक अनंतात विलीन

author img

By

Published : Dec 23, 2022, 10:35 AM IST

Updated : Dec 23, 2022, 4:27 PM IST

आज मुक्ता टिळक यांचे पार्थिवावर भाजप नेत्यांनी श्रद्धांजली ( Devendra Fadnavis Paid Homage To Mukta Tilak ) वाहिली. भाजपचे अनेक नेते मुक्ता टिळक यांच्या केसरीवाडा येथे अंत्यदर्शनासाठी दाखल झाले ( BJP MLA Mukta Tilak Funeral today ) होते. भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाच्या आजाराने गुरुवारी निधन झाले.

Mukta Tilak Passed Away
मुक्ता टिळक यांचे पार्थिव
मुक्ता टिळक अनंतात विलीन

पुणे : आज सकाळी ९ ते १० या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले ( Mukta Tilak Funeral ) होते. यावेळी विविध राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिकांकडून पार्थिवाचे दर्शन घेण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, चित्रा वाघ यांच्या विविध नेत्यांनी मुक्ता टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली ( Devendra Fadnavis Paid Homage To Mukta Tilak ) वाहिली.

देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना : आमच्या सगळ्यांसाठीच हा खूप दुःखाचा दिवस ( BJP Leaders Paid Homage To Mukta Tilak ) आहे. मुक्ता टिळक या आमच्या सहकारी होत्या. त्या कसबा मतदार संघाचे आमदार होत्या. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर एक अत्यंत संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर तसेच आमदार म्हणून जनसामान्यांशी त्यांचे एक कनेक्ट होता आणि शेवटी टिळक घराण्याचा जो वारसा आहे तो वारसा अतिशय समर्थपने त्या निभावत होत्या. मला असे वाटते की गेली 30 वर्ष मुक्ता टिळक या भारतीय जनता पक्षाच्या अतिशय एकनिष्ठ अशा कार्यकर्त्या म्हणून सामान्य कार्यकर्ते पासून ते वेगवेगळ्या पदांपर्यंत त्या पोहोचल्या त्या स्वतःच्या मेहनतीने आणि लोकांशी असलेल्या संपर्काने त्या ते पदापर्यंत पोहचल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तब्येत खराब असतानाही मतदान : त्या कल्पक होत्या त्या चांगल्या वक्त्या होत्या आणि एकूणच जे त्यांची वाटचाल होती ती बघितल्यानंतर कधीच असे वाटले नाही की अशा अर्ध्या वाटेत ते आम्हाला सगळ्यांना सोडून जातील. मला आठवते की राज्यसभेच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांची तब्येत अतिशय खराब असताना देखील मतदान करायला ते आल्या. मी तर विधान परिषदेच्या वेळी त्यांना सांगितले की एखादी जागा निवडून आली किंवा आपण हरलो यापेक्षा तुमचा जीव मोठा आहे. त्यामुळे तुम्ही येऊ नका कारण तुमची स्थिती काही एवढा प्रवास करून या ठिकाणी येण्याची नाही. पण तरी त्यांनी त्यांच्या घरच्यांकडे हट्ट धरला की पक्षाला आवश्यकता आहे म्हणून मी येणार आणि मतदान करणार आणि येऊन त्यांनी मतदान केले. त्यामुळे मला असे वाटते की अशा प्रकारचे समर्पित एक नेतृत्व एक कार्यकर्ता निघून जाणे पक्षाची आणि ती समाजाची देखील मोठी हानी आहे. ही हानी न भरून निघण्यासारखी नाही. मी देखील त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुक्ता टिळक यांच्यािषयी माहिती : मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक यांनी २०१७ ते २०१९ या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.

Last Updated : Dec 23, 2022, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.