पुणे : नुकत्याच पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यात नागपूरमधी जागा भाजपला गमवावी लागली आहे. नितीन गडकरी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असेल्याल्या नागपूरात भाजपला महाविकास आघाडीने धुळ चारली आहे. नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी झाले आहे. निवडणुकीचा निकाल पाहता भाजपला झटका मानला जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, नागपूरमध्ये आमचा विजय हा एक हजार टक्के झाला असता. पण शिक्षक परिषदेला ती जागा हवी होती. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे जय मल्हार कांती संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे आद्यकांतीवीर राजे उमाजी नाईक यांची १९१ वी पुण्यतिथी मानवंदना सोहळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बावनकुळे उपस्थित होते यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पराभव बाबत चिंतन : आम्ही त्यांना विनंती केली होती. सीटीग उमेदवार असल्याने आम्ही जास्त आग्रह केला नाही. तिथे फक्त समर्थन देऊन त्यांचे काम केले. त्यामुळे तिथे आमचा पराभव झाला असे जे म्हणत आहे तस काही नाही.जर आम्ही ती जागा लढली असली असती तर आम्ही जिंकली असती.अमरावतीच्या पराभव बाबत आम्ही चिंतन करू, तिथे मात्र, पराभव व्हायला नको होता असे यावेळी बावनकुळे यांनी म्हटल आहे.
जुन्या पेन्शन योजनेमुळे फटका : जुन्या पेन्शन योजनेमुळे हा फटका बसला आहे अस सांगितल जात आहे. यावर बावनकुळे म्हणाले की जुन्या पेन्शन योजनेमुळे हा फटका बसला आहे. हे जरी खर असल तर मग कोकणात आमचा उमेदवार कसा जिंकला. याचा अभ्यास करावे लागणार आहे. मराठवाडा, नाशिक, नागपूर येथे कशाचा फटका बसला आहे याचा अभ्यास आम्ही करणार असे बावनकुळे म्हणाले.
सत्यजित तांबे भाजपचे दरवाजे खुले : सत्यजित तांबे यांच्या बाबतीत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की सत्यजित तांबे यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले आहे. आमचे आमदार खासदार त्यांच्या बाजूने उभे होते. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावे. सत्यजित तांबे यांना आम्ही बोलवणार नाही तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्यांच्यासाठी आमची दरवाजे खुले आहेत असे मत बावनकुळे यांनी मांडले आहे.