पुणे - भाजप नेते किरीट सोमैया काल (शनिवारी) पुणे दौऱ्यावर होते. ( Kirit Somaiya on Pune Visit ) या दौऱ्यामध्ये एसएससी बोर्ड एचएससी बोर्ड यांना भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या हे पुणे महानगरपालिकेमध्ये निवेदन देण्यासाठी आले होते. मात्र, शिवसैनिकांनी आणि शहराध्यक्षांनी घोळ घालत किरीट सोमैया यांना धक्काबुक्की केली. याच्यातून ते सुखरूप बचावले. यानंतर त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ( Kirit Somaiya Got Discharge from Sancheti Hospital ) त्यांना कोणतीही हानी झाली नाही. डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी काल त्यांचे अर्धवट काम राहिलं आज पूर्ण केलं आणि त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले.
त्यांच्या समवेत भाजप प्रवक्ता संदीप खर्डेकर, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, भाजयुमो चे सरचिटणीस *प्रतीक देसरडा, सुनील मिश्रा, उपाध्यक्ष प्रशांत सुर्वे, योगेश कुलकर्णीव अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. मनपा चे सहाय्यक सुरक्षा अधिकारी श्री. शंकर घायतडक यांनी निवेदन स्वीकारले.
हेही वाचा - VIDEO : भाजपा नेते किरीट सोमैयांवर शिवसैनिकांचा हल्ला; पाहा नेमकं काय घडलं?
सोमैयांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया -
महापालिकेच्या आवारात भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया ( Shivsena Attack On Kirit Somaiya ) यांच्यावर आज हल्ला करण्यात आला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ( Chandrakant Patil Met With Kirit Somaiya At Sancheti Hospital ) संचेती रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. आज जो शिवसैनिकांच्यावतीने हल्ला झाला आहे, तो हल्ला नव्हे, तर त्यांना पूर्ण मारण्याची योजना झाली होती. हे राज्य सरकार आहे, की गुंडा राज आहे. सत्तेत असणारा पक्ष जर अशा पद्धतीने कायदा हातात घेत असेल, तर सर्वसामान्य माणसाने काय करायचं. अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच केंद्राची सुरक्षा नसती, तर किरीट सोमैयांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असेही ते म्हणाले.