ETV Bharat / state

भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेंचा आरोप

author img

By

Published : Sep 23, 2019, 4:56 PM IST

Updated : Sep 23, 2019, 5:20 PM IST

शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मेटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांशी जागा वाटप होईल आणि त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील, असे सांगितले होते. पण तसे होताना दिसत नाही.

भाजप घटक पक्षांना विचारात घेत नाही, विनायक मेटेचा आरोप

पुणे- राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. आचारसंहिता लागू झाली तरीही अजून महायुतीची घोषणा होत नाही, हे कशाचे लक्षण आहे? भाजपला खरेच युती करायची आहे का? असा प्रश्न शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत दोन-तीन बैठका झाल्या आहेत. परंतु, या बैठकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांना विचारात घेण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. पुण्यातील जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरीत शिवसंग्राम पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळेस ते बोलत होते. भाजपला खरेच महायुती करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी घटक पक्षांसोबत चर्चा केली पाहिजे. परंतु, असे होताना दिसत नाही. असे सांगत शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मेटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांशी जागा वाटप होईल आणि त्यानंतरच भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील, असे सांगितले होते. पण तसे होताना दिसत नाही. महायुतीत शिवसंग्राम पक्षाने 12 जागांची मागणी केली आहे. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. मात्र, ही चर्चा पुढे सरकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा होत असताना भाजपने इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. असे मत मेटे यांनी व्यक्त केले. युती नाही झाली तरीही शिवसंग्राम स्वतंत्र लढण्यास तयार आहे. युती झाली आणि युतीतील घटकपक्ष भाजप चिन्हावर लढले तर आम्हीही भाजप चिन्हावर लढू, असेही मेटे यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली तरीही महायुतीची घोषणा होत नाही हे कशाचे लक्षण आहे? भाजपला खरच युती करायची आहे का? असा प्रश्न शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत दोन-तीन बैठका झाल्या.. परंतु या बैठकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांना विचारात घेतले नाही.. भाजपला खरच महायुती करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी घटक पक्षांसोबत चर्चा केली पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.... असे सांगत शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला.. पुण्यातील जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरीत शिवसंग्राम पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.... या मेळाव्यात पुण्यातील काही तरुणांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला ..त्यानंतर विनायक मेटे बोलत होते...Body:मेटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांची जागा वाटप होईल आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील असे सांगितले होते..पण तसे काही होताना आता दिसत नाही.. महायुतीत शिवसंग्राम पक्षाने 12 जागांची मागणी केली आहे..यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशीही बोलले आहोत मात्र ही चर्चा पुढे सरकत नाही... त्यामुळे युतीची चर्चा होत असताना भाजपने इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले....अन्यथा युती नाही झाली तरीही शिवसंग्रामही स्वतंत्र लढण्यास तयार आहे.. युती झाली आणि युतीतील घटकपक्ष भाजप चिन्हावर लढले तर आम्हीही भाजप चिन्हावर लढू असेही विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.....

Conclusion:...
Last Updated : Sep 23, 2019, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.