ETV Bharat / state

भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Sep 6, 2020, 1:35 PM IST

पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करून शनिवारी माहिती दिली.

कोरोनाची लागण
कोरोनाची लागण

पुणे : कोरोनाच्या विषाणूने अनेक नेत्यांना गाठलं आहे. भाजपा शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत मुळीक यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून माहिती दिली.

  • 'त्यानं' मला गाठलं याचं दु:ख नाही. पण तुम्हा सर्वांपासून काही काळ दुर जावं लागणार याचं वाईट वाटतं आहे. मी #कोरोना_पॉझिटीव्ह असल्याचं आज स्पष्ट झालं.
    आता युद्ध कोरोनाच्या विरोधात. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाच्या बळावर मी लवकरच ठणठणीत होईनच. तोवर तात्पुरता राम राम घ्यावा. 🙏🏻 pic.twitter.com/eFPWpnecsw

    — Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) September 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जगदीश मुळीक यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. ते पुढील उपचारासाटी रुग्णालयात दाखल झाले असल्याचे त्यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले. 'त्यानं' मला गाठलं याचं दुःख नाही. पण, तुम्हा सर्वांपासून काही काळ दूर जावं लागणार, याचं वाईट वाटत आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शनिवारी स्पष्ट झालं. आता युद्ध कोरोनाच्या विरोधात. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर मी लवकरच ठणठणीत होईनच. तोवर तात्पुरता राम राम घ्यावा, अशी जगदीश मुळीक यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

दरम्यान, पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा - 'मी दबावात काम करणारा अधिकारी नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.