ETV Bharat / state

भाजपाकडून दगडाला दुधाचा अभिषेक, दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक

दुधाला प्रतिलिटर 30 रूपये हमीभाव किंवा 10 रूपये अनुदान आणि दूध पावडर निर्यातीला किलोला 50 रूपये अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान सभा, किसान संघर्ष समिती, दूध उत्पादक संघर्ष समिती आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र दूध दरवाढीसाठी दूध संकलन बंद ठेऊन एल्गार पुकारला आहे.

Bjp protest for milk rate
Bjp protest for milk rate
author img

By

Published : Aug 1, 2020, 11:28 AM IST

पुणे - दूध दरवाढ मिळण्यासाठी सुरू केलेले आंदोलन आता चांगलेच तापू लागले आहे. दुधाला प्रतिलिटर 30 रूपये हमीभाव किंवा 10 रूपये अनुदान आणि दूध पावडर निर्यातीला किलोला 50 रूपये अनुदान मिळावे, या मागण्यांसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षासह किसान सभा, किसान संघर्ष समिती, दूध उत्पादक संघर्ष समिती आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र दूध दरवाढीसाठी दूध संकलन बंद ठेऊन एल्गार पुकारला आहे.

या आंदोलनात दूध रस्त्यावर न ओतता आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्याठी दगडाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलकांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.

शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसाय करत आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळापासून दुधाचे दर निम्म्याने घटविण्यात आल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत चालला आहे. अखेर हा शेतकरी आता आंदोलनात सहभागी झाला आहे. आपल्या भावना माय बाप सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी दगडाला अभिषेक घालून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या सरकारने शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेऊन दुधाला अनुदान देण्याची मागणी भाजपने यावेळी केली आहे.

"संघर्ष दुधाचा.. लढा हक्काचा"

महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेऊन दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याने खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी "संघर्ष दुधाचा.. लढा हक्काचा" असा नारा देत दुधाला अनुदान व हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू केले आहे. दूध संकलन न करता दुधाचे गोरगरिबांना वाटप करून सरकारी धोरणांचा निषेध करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.