ETV Bharat / state

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना काळातल्या कामाची नोंद इतिहासात होईल - उपमुख्यमंत्री

पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रम आज (दि.22 जून) पार पडला. रुग्णसेवेबद्दल आणि कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठतेबद्दल या महाविद्यालयाच्या कार्याची नोंद इतिहासात होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

author img

By

Published : Jun 23, 2021, 9:39 PM IST

bj medical college work in corona will always be remembered
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना काळातल्या कामाची नोंद इतिहासात होईल - उपमुख्यमंत्री

पुणे - बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णसेवेची प्रदीर्घ परंपरा आहे. समाजासाठी तज्ञ डॉक्टर घडविणाऱ्या देशभरातील संस्थांमध्ये बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचा अव्वल क्रमांक लागतो. रुग्णसेवेबद्दल आणि कोरोना काळात बजावलेल्या कर्तव्यनिष्ठतेबद्दल या महाविद्यालयाच्या कार्याची नोंद इतिहासात होईल, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. आज (दि.23 जून) महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन सहभागी झाले होते. पुण्यात आणि राज्यात रुग्णसेवेचा आदर्श, गौरवशाली परंपरा निर्माण करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजची सुरुवात झाली. या वैद्यकीय महाविद्यालयाने पुण्यातील तसेच राज्यातील जनतेची, रुग्णांची अनेक वर्षे सेवा केली आहे. कोरोनाच्या काळात ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय हे आपले प्रमुख आधारस्तंभ बनले आहेत असे अजित पवार म्हणाले.

तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करण्याचे काम महाविद्यालयाने कायम सुरु ठेवावे - उपमुख्यमंत्री

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकून अनेक विद्यार्थी तज्ञ डॉक्टर म्हणून देश-विदेशात रुग्णांची सेवा करत आहेत. ससून रुग्णालयात राष्ट्रपिता महात्मा गांधींसह अनेक मान्यवरांनी उपचार घेतले आहेत. गेल्या दिड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटातही अनेकांनी या रुग्णालयामध्ये उपचार घेतले आणि ते बरे झाले आहेत. ससून आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय संस्था आहेत. रुग्णसेवा आणि समाजसेवा या ध्येयाने या संस्था काम करतात. कोरोनाकाळात अनेक रुग्ण उपचारासाठी पहिल्यांदा खासगी रुग्णालयात दाखल झाले, मात्र चांगले उपचार मिळावेत, यासाठी ते ससून रुग्णालयात भरती होत होते. कोणत्याही खाजगी रुग्णालयापेक्षा चांगली अत्याधुनिक उपचार यंत्रणा आणि रुग्णसेवा ससूनमध्ये मिळते, हा लोकांचा विश्वास आहे. अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत इथे येत होते, त्यातल्या अनेकांचे प्राण आपण वाचवले आहेत. अत्याधुनिक उपचार यंत्रणा, दर्जेदार रुग्णसेवा, समाजासाठी तज्ज्ञ डॉक्टर निर्माण करण्याचे काम महाविद्यालयाने कायम सुरु ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोरोना काळातही उपमुख्यमंत्र्यांनी निधी कमी पडू दिला नाही - अमित देशमुख

या कार्यक्रमात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख देखील ऑनलाइन उपस्थित होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाला गौरवशाली इतिहास आहे. कोरोना संकटातही या महाविद्यालयाने आपला गौरवशाली इतिहास कायम ठेवला आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायम तत्पर असतात, कोरोना काळात त्यांनी आपल्या विभागाला निधी कमी पडू दिला नाही, असे अमित देशमुख यावेळी म्हणाले.

हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यातून डेल्टा प्लसचे नमुने गोळा केले जाणार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.