पुणे : पुणे शहरात मागच्या महिन्यात सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून 2 युवकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. वर्षभरात पुणे सायबर पोलीस स्टेशन येथे सेक्सटॉर्शनचे तब्बल 1400 अर्ज आले आहे. तर सेक्सटॉर्शन बाबत एक गुन्हा दाखल आहे. आत्ता या सेक्सटॉर्शनच्या घटनेत पुणे पोलिसांना मोठा यश आलं आहे. पुण्यात जे दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी अधिकचा तपास केला असता, हा आरोपी ज्या गावातील आहे. तो गाव 500 घरांचा आणि या गावात घरातील एक जण हा अश्या सेक्सटॉर्शन तसेच सायबर गुन्ह्याशी निगडित आहे. अन्वर सुबान खान २९ वर्षे रा. गुरुगोठडी ता लक्ष्मणगठ जि अलवर रा. ह राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
दत्तवाडी प्रकरणात आरोपी अटक : पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच प्रीत यादव या तरुणी सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. पुढे दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे, अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. आणि या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत होता. आणि अशा प्रकारे महाराष्ट्र तसेच देशभर ऑनलाईन सेक्सटॉर्शन करून खंडणी मागण्याचा घुमाकुळ घातला आहे. देशात धुमाकुळ घालणाऱ्या राजस्थान मधील गुरुगोठडी ता.लक्ष्मणगढ जि. अलवर मधुन यंत्रणा चालविणाऱ्या मास्टरमाईंड आरोपी नामे अन्वर सुबान खान वय २९ वर्षे रा. गुरुगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य राजस्थान यास दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने तांत्रीक विश्लेषन करून व लोकेशनव्दारे शोध घेऊन ताब्यात घेतले आहे.
वेषांतर करून पोलिसांनी पकडलं : दत्तवाडी पोलिसांकडून 5 लोकांचं एक पथक हे गुरुगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर राज्य राजस्थान येथे पाठविण्यात आले होते. पोलिसांनी यावेळी व्याशंतर करून त्या गावात गेले आणि आरोपीची माहिती घेतली. आणि डोक्यावर पगडी, गमछा असा तेथील पोशाख परिधान केला आणि गुरुगोठडी या गावात ते गेले.आणि आरोपीला अटक केली. आरोपीला त्याच्या घराकडून घेवून जात असतांना आरोपीच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करुन आरोपीस पळवून लावले असता. त्या आरोपीचा ०२.५ कि.मी पाठलाग वारून, जीवाची पर्व न करता दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने ०५ मोबाईल सह आरोपीस ताब्यात घेतल आहे.
जामतारा 2 : मध्यंतरी जामतारा या गावावर आधारित एक वेब सिरीज आली होती. यात अख्खा गाव हा सायबर गुन्हे करत होता. तसेच राजस्थान मधील गुरुगोठड या गावात देखील असाच प्रकार हा समोर आला आहे. या आरोपी अन्वर खान यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यागावातील सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सटॉर्शनचे प्रशिक्षण घेवून अशा प्रकारे नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रमाण गुरुगोटडी ता.लक्ष्मणगढ जि. अलवर (राजस्थान) गावात मोठ्या प्रमाणात चालते.
कशी होते फसवणूक : साधारणतः हा आपल्याला आपल्या व्हॉट्सॲपवर एका नंबरवरून सुंदर मुलीचं फोटो येतो. आणि त्यांनतर हळूहळू ओळख केली जाते.आणि जस जशी ओळख निर्माण होते तसच समोरून आग्रह केला जातो की व्हिडियो कॉल वर बोलूया. आणि त्यानंतर जेव्हा व्हिडियो कॉल केला जातो. तेव्हा समोर असलेली मुलगी न्यूड होते. ती आपल्याला ही न्यूड होण्याबाबत आग्रह करते. चेहरा कॅपचर करण्यासाठी दोन मिनिटांचा व्हिडियो कॉल केला जातो. आणि लगेच व्हॉट्सॲपवर या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ येतो. तेथून धमक्यांना सुरवात होते. पहिल्यांदा अशी धमकी दिली जाते की, जर आपण पैसे नाही दिले, तर मी तक्रार दाखल करेल. अन्यथा सोशल मीडियावर व्हायरल करेल, अशी धमकी दिली जाते. याच धमकीला तरुण बळी पडतात. आणि पैसे देतात. जर पैसे दिले गेले नाही, तर सोशल मीडियावर व्हायरल केलं जातं आणि बदनामी होऊ नये, म्हणून तरुण टोकाचं पाऊल उचलतात.
पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400 अर्ज : पुणे सायबर पोलिसांकडे सेक्सटॉर्शनचे 1400 हून अधिक अर्ज आले आहेत. पोलीस याचा तपास करत आहे. आमच्याकडे अर्ज घेऊन आलेल्या व्यक्तीकडून पूर्ण माहिती घेतली जाते. आणि त्याला समजावून सांगितलं जातं की, कोणत्याही प्रकारचे पैसे भरू नये. आणि पॅनिक होऊ नये. आणि कोणताही टोकाचं पाऊल उचलू नये, असे सांगितल जाते. जर अर्जदाराने पैसे भरले असेल, तर बँक डिटेल घेऊन तशी चौकशी केली जाते. तसेच व्हॉट्सॲपवरून माहिती घेऊन पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांकडून आवाहन : पुणे पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, अनोळखी व्यक्ती जर कोणीही व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावरून बोलत असतात. तर त्याकडे दुर्लक्ष करावे, तसेच जर संशय आला तर लगेच संबंधित अनोळखी व्यक्तीला ब्लॉक करा. तसेच घाबरून जाऊ नका. कोणीही अधिकृत सोशल मीडियावर तुमचं व्हिडियो व्हायरल करू शकत नाही. तसेच जर कोणीही धमक्या दिल्या तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल करा. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
दत्तवाडीमध्ये पहिली आत्महत्या : पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाच प्रीत यादव या तरुणी सोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे, अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. आणि या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय शंतनू वाडकर या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये शंतनू वाडकर हा 19 वर्षीय तरुण राहण्यास होता.
राहत असलेल्या इमारतीवरून उडी मारली : तो सोशल मीडिया सक्रिय होता. शंतनू याची इन्स्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. त्याच दरम्यान प्रीत यादव हिने शंतनूला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेयर केले आहे. त्यानंतर मला पैसे दे, अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल, अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने 4 हजार 500 रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागवू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून शंतनूने 28 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत असलेल्या इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.
30 सप्टेंबरला धनकवडी परिसरात अशीच घडली होती घटना: पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने अमोल राजू गायकवाड (रा. तानाजी नगर, धनकवडी) या तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
मानसिक त्रास देण्यास सुरुवात: 2 अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाला याचा त्रास होऊ लागला. अखेर अमोलने तिला संदेश पाठविला की, 'मैं सुसाईड करा रहा हूँ'. त्यावर तिने 'करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हिडिओ व्हायरल कर रही हूँ', अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोलने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.