ETV Bharat / state

Potholes on Hadapsar Saswad Road : हडपसर-सासवड महामार्गावर खड्डे; गडकरींनी लक्ष घालावं - सुप्रिया सुळे

Potholes on Hadapsar Saswad Road : खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी महामार्गावरील खड्ड्यांबाबत ट्विट केलंय. हडपसर ते सासवड या महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांचे फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. पाणी साचल्यामुळं रसत्यावर दगड दिसत नाहीत. या रस्त्यावर अपघात होत असल्याचं सांगत त्यांनी यंत्रणेनं लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

Potholes on Hadapsar Saswad Road
Potholes on Hadapsar Saswad Road
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 10:18 PM IST

पुणे Potholes on Hadapsar Saswad Road : संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील हडपसर-सासवड भोईनगर ते उरुळी फाटा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या मुसळधार पाऊसामुळं रस्त्यावरी खड्डे वाहन चालकांना दिसत नाहीय. या महामार्गावर स्थानिक नागरिक, विद्यार्थी, नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळं या ठिकाणी सात्यानं अपघात होत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देऊन संबंधित विभागाला सूचना जारी करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये केलीय.

  • संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर हडपसर-सासवड रोडवर भेकराईनगर ते उरुळी फाटा मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, यामध्ये पाणी साचत असल्याने प्रवाशांना खड्डे दिसत नाहीत.
    या महामार्गावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, विद्यार्थी… pic.twitter.com/D27bgvugpa

    — Supriya Sule (@supriya_sule) October 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रस्त्यावर मोठंमोठे खड्डे : हडपसर ते सासवड रोडवर पसरलेले खड्डे आणि रस्त्याची चाळण यामुळं हा परिसर धुळीनं माखला आहे. त्यामुळं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो दुचाकीस्वारांना मणक्याचे फुफ्फुसाच्या आजारांनी ग्रासले आहे. या खड्ड्यांमुळं अनेकांचे बळी गेले असून, अपघातात शेकडो लोक अपंग झाले आहेत, असं असतानाही रस्ता दुरुस्त करून चौपदरीकरण न केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

खड्ड्यांमुळं वाहतूक कोंडी : हडपसर-सासवड रोडवरील तुकाईदर्शन, आयबीएम कंपनीसमोर, गंगानगर चौक, भेकराईनगर, विठ्ठल पेट्रोल पंपासमोर, उड्डाणपुलाच्या सुरुवातीपासून ते मंतरवाडी चौक, उरुळी देवाची चौक, वडकीपर्यंत खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमुळं येथील नागरिकांची नित्याची वाहतूक कोंडी झाली आहे. तसंच या भागातील रहिवाशांना शुद्ध हवा मिळत नाही. या रस्त्याच्या समस्येमुळं दररोज एक अपघात होत आहे.

खड्यामुळं शेकडो जखमी : गेल्या पाच वर्षांत येथे शेकडो अपघात झाले आहेत. अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी झाले आहेत. मात्र, अधिकारी, राजकीय मंत्र्यांना याचं गांभीर्य दिसत नाही. हडपसर ते जेजुरी हा रस्ता चौपदरी करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. रस्त्यावरील झाडेही काढण्यात आली, मात्र रस्त्याचं डांबरीकरण झालं नाही. रस्त्यावरील खडी, मातीमुळं हवेतील धुलिकणांचं प्रमाण वाढल्यानं नागरिकांमध्ये फुफ्फुसाचे आजार वाढले आहेत.

हेही वाचा -

  1. Waghnakh in Maharashtra : शिवरायांची 'वाघनखे' आणण्यासाठी मुनगंटीवार सोमवारी ब्रिटनला होणार रवाना; तीन वर्षांसाठी करार
  2. Sharad Pawar On Varkari Sansthan : देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी विचारधारा म्हणजे वारकरी संस्थान - शरद पवार
  3. Aaditya Thackeray Criticizes BJP : माझा तुम्ही 'बाळ' असा उल्लेख केला याचा अभिमान; आदित्य ठाकरेंची भाजपावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.